फोटो सौजन्य: iStock
पूर्वी बाईक खरेदी करताना ग्राहक फक्त त्याच्या मायलेज आणि किमतीवर जास्त लक्ष केंद्रित करायचे. पण आज ही स्थिती बदलताना दिसत आहे. आज विशेषकरून तरुण वर्ग जेव्हा बाईक खरेदी करण्यास जातो तेव्हा तो पॉवरफुल बाईकच्या शोधात असतो. म्हणूनच तर आज मार्केटमध्ये पॉवरफुल बाईक देखील मोठ्या प्रमाणत उत्पादित केल्या जातात. यामध्ये रॉयल एनफील्डपासून ते बजाजपर्यंतच्या मॉडेल्सचा समावेश आहे. पण अनेकदा या बाईक्स खूप महाग असतात, ज्यामुळे कित्येक जण ते खरेदी करण्याचे टाळतात. म्हणूनच आज आपण 3 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या 5 पॉवरफुल बाईक्सबद्दल जाणून घेणार आहोत. या बाईकमध्ये अनेक उत्तम फीचर्स असण्यासोबतच उत्तम लूक देखील आहे.
यात 373 सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन वापरले आहे, जे 40 पीएस पॉवर आणि 35 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन स्लिप-अँड-असिस्ट क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. याची टॉप स्पीड सुमारे 154 किमी प्रतितास आहे. भारतात, NS400Z ची किंमत 1.86 लाख रुपये आहे.
या बाईकमध्ये 452 सीसी लिक्विड-कूल्ड इंजिन वापरण्यात आले आहे. त्याचे इंजिन 40.02 पीएस पॉवर आणि 40 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन स्लिप आणि असिस्ट क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. याची टॉप स्पीड 140 किमी/तास आहे. भारतात, गुरिल्ला 450 ची एक्स-शोरूम किंमत 2.39 लाख ते 2.54 लाख रुपये आहे.
या बाईकमध्ये 398.15 सीसी लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन वापरले आहे, जे 40 पीएस पॉवर आणि 37.5 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन स्लिप-अँड-असिस्ट क्लचसह 6-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. याचा टॉप स्पीड 145 किमी प्रतितास आहे. ही बाईक भारतात 2.42 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत उपलब्ध आहे.
यात 398.63 सीसी, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन वापरले आहे, जे 46 पीएस पॉवर आणि 39 एनएमचा टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन सहा-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे आणि त्यात बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर आहे. याची टॉप स्पीड 160 किमी प्रतितास आहे. ही बाईक भारतात 2.96 लाख रुपयांना उपलब्ध आहे.
यात 398.6 सीसी, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन वापरले आहे, जे 46 पीएस पॉवर आणि 39 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन स्लिप-अँड-असिस्ट क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. याची टॉप स्पीड 167 किमी/तास आहे. KTM 390 Duke भारतात 2.95 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.