फोटो सौजन्य: iStock
भारतात नेहमीच स्टायलिश आणि हाय परफॉर्मन्स बाईक्सनी आपली हवा केली आहे. तरुणांचा देखील अशा बाईक्स खरेदी करण्याकडे जास्त कल असतो. म्हणूनच तर देशात स्टायलीश आणि आकर्षक लूक असणाऱ्या बाईकची विक्री झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यातही रॉयल एन्फिल्डच्या बाईक्सने भारतीय मार्केटमध्ये आपला एक विशेष चाहता वर्ग बनवला आहे. हंटर 350 आणि बुलेट 350 या दोन बेस्ट बाईक कंपनी मार्केटमध्ये ऑफर करते.
नुकतेच रॉयल एनफील्डने नवीन रॉयल एनफील्ड हंटर 350 लाँच केली आहे. त्यात एलईडी हेडलाइट्सपासून नवीन सस्पेंशनपर्यंत अनेक फीचर्स अपडेट केले गेले आहे. कंपनी रॉयल एनफील्ड बुलेट 350 देखील त्याच इंजिन आणि फीचर्ससह येते. या दोन्ही बाईक मार्केटध्ये खूप लोकप्रिय आहेत. म्हणूनच आज आपण या बाईक्सची तुलना करणार आहोत. तसेच डिझाइन, फीचर्स, इंजिन आणि किंमतीच्या बाबतीत कोणती बाईक चांगली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
रॉयल एनफील्ड हंटर 350: ही एक निओ-रेट्रो रोडस्टर बाईक आहे, जी तरुणांना विशेष लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. तिचा कॉम्पॅक्ट आणि मस्क्युलर लूक, गोल एलईडी हेडलॅम्प (मेट्रो व्हेरियंटमध्ये), टियरड्रॉप फ्युएल टॅंक आणि सिंगल-पीस सीट यामुळे ही बाईक अधिक स्टायलिश लूक देते. ही फॅक्टरी ब्लॅक, रिओ व्हाइट, डॅपर ग्रे, बेल ब्लू, लंडन रेड आणि टोकियो ब्लॅक रंगात येते.
रॉयल एनफील्ड बुलेट 350: या बाईकमध्ये मोठे फ्युएल टॅंक, क्रोम अॅक्सेंट आणि गोल हेडलॅम्प्स तिला रेट्रो लूक देतात. ही बाईक मिलिटरी ब्लॅक, स्टँडर्ड मरून आणि ब्लॅक गोल्ड आणि अशा सात रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
दोन्ही बाईक 349 सीसी, सिंगल-सिलेंडर, एअर/ऑइल-कूल्ड जे-सिरीज इंजिन वापरतात, जे 20 पीएस पॉवर आणि 27 एनएम टॉर्क जनरेट करते. या दोन्हींचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहेत. दोन्ही बाईक्सचा टॉप स्पीड सुमारे 114-130 किमी प्रतितास आहे. बुलेट 350 बाईक 37 किमी प्रति लिटर मायलेज देते. तर हंटर 36.2 किमी प्रति लिटरचा मायलेज देते.
फुल्ल टाकीत 600 KM पेक्षा जास्त धावणारी ‘ही’ बाईक फक्त 2 हजारांच्या EMI वर होईल तुमची
रॉयल एनफील्ड हंटर 350: या बाईकमध्ये एलईडी हेडलाइट पाहायला मिळते. आता तर त्यात मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी USB टाइप-सी चार्जिंग पोर्ट देखील दिले आहे. यात टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि एसएमएस/कॉल अलर्टसह स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी देखील आहे.
रॉयल एनफील्ड बुलेट 350: यात सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. तसेच यूएसबी चार्जिंग पोर्ट, डिजिटल फ्युएल गेज, ट्यूबलेस टायर्स, हॅलोजन हेडलाइट, एलईडी टेललाइट, बल्ब टाइप टर्न सिग्नल लॅम्प यांसारखी फीचर्स देखील देण्यात आली आहेत.
रॉयल एनफील्ड हंटर 350 भारतीय बाजारात 1.49 लाख ते 1.81 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. तर रॉयल एनफील्ड बुलेट 350 ही भारतीय बाजारात 1.74 लाख ते 2.18 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.