फोटो सौजन्य: iStock
कार खरेदी करणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. मात्र, कार खरेदी करणे सोपे काम नाही. खासकरून मध्यम वर्गीय लोकांसाठी. सगळेच जण कार खरेदी करण्यापूर्वी बजेट आखात असतात. याही पेक्षा थोडे कठीण काम असते ते आपल्या कुटुंबासाठी योग्य कार निवडणे. त्यातही शहरात राहणारी लोकं अशा कारच्या शोधात असतात जी रहदारीत सुद्धा आरामात चालेल. हीच बाब लक्षात घेत, आज आपण अशा 4 कारबद्दल जाणून घेऊयात, ज्या शहरात चालवण्यासाठी योग्य आहेत.
जर तुम्ही परवडणारी, कॉम्पॅक्ट आणि स्टायलिश हॅचबॅकच्या शोधत असाल, तर मारुती सुझुकी इग्निस तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकते. ही कार विशेषतः शहरांसाठी डिझाइन केलेली आहे. यात 1.2-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे कदाचित खूप पॉवरफुल नसेल, परंतु याच्या हलक्या वजनामुळे आणि कॉम्पॅक्ट डिझाइनमुळे, ही कार ट्रॅफिकमध्ये सहज चालवता येते. याचा ग्राउंड क्लिअरन्स देखील चांगला आहे, ज्यामुळे ती खडबडीत रस्त्यांवरही आरामात चालवली जाऊ शकते. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, इग्निसची एक्स-शोरूम किंमत 5.85 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 8.12 लाख रुपयांपर्यंत जाते.
ड्रायव्हिंग दरम्यान केल्यात 4 चुका, कार मायलेज येईल धाडकन खाली; सतत भरावे लागेल पेट्रोल
जर तुम्हाला शहरी ड्रायव्हिंगसोबतच स्पोर्टी फील हवा असेल, तर तुमच्यासाठी Hyundai i20 N Line हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ही कार स्टँडर्ड i20 पेक्षा खूपच वेगळी आहे, कारण त्यात 1.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. DCT व्हेरिएंटमध्ये स्पोर्टी सस्पेंशन, ड्युअल-टिप एक्झॉस्ट आणि पॅडल शिफ्टर्स सारखी फीचर्स देखील आहेत. याची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 12.56 लाख रुपयांपर्यंत जाते.
अलीकडेच भारतीय बाजारात स्कोडाने Kylaq लाँच केली आहे. ही MQB-A0-IN प्लॅटफॉर्मवर बनवलेली एक सब-4-मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. यात 1.0-लिटर TSI इंजिन आहे जे सुमारे 108 bhp पॉवर आणि 178 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दोन्ही पर्यायांसह येते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कारला 5-स्टार भारत NCAP सेफ्टी रेटिंग मिळाली आहे जे कुटुंबासाठी एक सुरक्षित पर्याय मानली जाते. स्कोडा Kylaq ची किंमत 8.25 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 13.99 लाख रुपयांपर्यंत जाते.
संजय दत्तने खरेदी केली 4 कोटीची Mercedes Maybach GLS600, काय आहेत खास फिचर्स
शहरामध्ये चालवण्यासाठी मारुती डिझायर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ही कार कॉम्पॅक्ट साइजमध्ये येते, त्यामुळे पार्किंग करणे आणि ट्रॅफिकमध्ये चालवणे सोपे होते. डिझायरमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे स्मूथ ड्रायव्हिंगसह चांगलं मायलेज देते. जे लोक सेडान कार घेऊ इच्छितात पण जास्त बजेट खर्च करू इच्छित नाहीत, त्यांच्यासाठी हा योग्य पर्याय आहे. या कारची किंमत 6.51 लाख रुपयांपासून सुरू होऊन 9.39 लाख रुपयांपर्यंत जाते.