फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या चांगल्या बाईक्स आणि स्कूटर ऑफर करत असतात. हल्ली मार्केटमध्ये बाईकच्या ही तोडीसतोड अशा बेस्ट स्कूटर आल्या आहेत. यातच जर तुमचे बजेट 1 लाख रुपयांपर्यंत असेल आणि तुम्ही चांगली स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण या श्रेणीत अनेक उत्कृष्ट स्कूटर उपलब्ध आहेत जे फीचर्स, मायलेज आणि विश्वासार्हतेच्या बाबतीत उत्कृष्ट आहेत.
चला तर मग अशा पाच लोकप्रिय स्कूटर्सबद्दल जाणून देऊया, ज्यांची ऑन-रोड किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी किंवा जवळपास आहे आणि त्या कामगिरी, स्टाइल आणि मायलेजचे उत्तम कॉम्बिनेशन घेऊन येतात.
40 हजार पगार असणारी व्यक्ती सुद्धा विकत घेईल MG Windsor EV, फक्त ‘एवढा’ असेल EMI?
होंडा अॅक्टिव्हा 6जी ची ऑन-रोड किंमत 92,181 ते 98,731 रुपयांच्या दरम्यान आहे. यात 109.51 सीसी इंजिन आहे, जे प्रति लिटर 59.5 किलोमीटर मायलेज देते. त्याचा टॉप स्पीड 85 किमी प्रतितास आहे. होंडा अॅक्टिव्हा ही भारतीय बाजारपेठेत सर्वात विश्वासार्ह आणि सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर मानली जाते, ज्याची बिल्ट क्वालिटी आणि कमी मेंटेनन्स यामुळे ती एक परिपूर्ण फॅमिली स्कूटर बनते.
टीव्हीएस ज्युपिटरची ऑन-रोड किंमत 88,561 ते 1.06 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. यात 113.3 सीसी इंजिन आहे आणि ते 48 किमी प्रति लिटर मायलेज देते. त्याची टॉप स्पीड 82 किमी प्रतितास आहे. ही स्कूटर तिच्या मजबूत पकड, उत्तम राइड आणि उत्कृष्ट ग्राउंड क्लिअरन्ससाठी ओळखली जाते, ज्यामुळे ती दररोजच्या राइडिंगसाठी आदर्श बनते.
सुझुकी अॅक्सेस 125 ची ऑन-रोड किंमत सुमारे 1 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 124 सीसी इंजिन आहे जे 8.42 पीएस पॉवर निर्माण करते आणि 45 किमी प्रति लिटर मायलेज देते. ही स्कूटर अशा ग्राहकांसाठी परिपूर्ण आहे जे थोडी अधिक शक्ती, उत्तम डिझाइन आणि चांगले कार्यप्रदर्शन शोधत आहेत.
टीव्हीएस ज्युपिटर 125 ची ऑन-रोड किंमत 93,891 रुपयांपासून सुरू होते. यात 124.8 सीसी इंजिन आहे जे 57.27 किमी प्रति लिटर मायलेज देते आणि 95 किमी प्रति तासाचा टॉप स्पीड देते. ही स्कूटर विशेषतः अशा कुटुंबांसाठी डिझाइन केली आहे ज्यांना अधिक जागा, आरामदायी प्रवास आणि चांगली इंधन कार्यक्षमता हवी आहे.
Tata Curvv चा CNG व्हेरियंट मार्केटमध्ये लवकरच दाखल होणार, टेस्टिंग दरम्यान झाली स्पॉट
यामाहा फॅसिनो 125 एफआय हायब्रिडची ऑन-रोड किंमत 99,969 रुपयांपासून सुरू होते. यात 125 सीसी इंजिन आहे, जे 68.75 किमी प्रति लिटर मायलेज देते आणि त्याचा टॉप स्पीड 90 किमी प्रति तास आहे. ही स्कूटर विशेषतः तरुणांना लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली त्याची स्टायलिश डिझाइन आणि उत्कृष्ट मायलेज यामुळे ती एक स्मार्ट निवड बनते.