फोटो सौजन्य; iStock
भारतीय मार्केटमध्ये कित्येक वर्षांपासून टाटा मोटर्स उत्तम कार ऑफर करत आहे. कंपनी नेहमीच ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार उत्तम कार्स ऑफर करण्याचा प्रयत्न करत असते. सध्या कंपनी इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर विशेष भर देताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे ग्राहकांचा EV कडे असणारा कल. पण यासोबतच कंपनी आपल्या एका कारचे सीएनजी व्हेरियंट मार्केटमध्ये आणायच्या तयारीत आहे.
टाटा मोटर्सची नुकतीच लाँच झालेली कूप एसयूव्ही, टाटा कर्व्हचे आता सीएनजी व्हेरियंट अलीकडेच भारतातील रस्त्यांवर टेस्टिंग करताना दिसले. यामुळे, हे नक्की झाले आहे की लवकरच भारतात टाटा कर्व्हचा सीएनजी व्हेरियंट दाखल होणार आहे. Tata Curvv CNG व्हेरियंटमध्ये काय पाहायला मिळेल त्याबद्दल जाणून घेऊया.
टाटा कर्व्ह सीएनजीचे डिझाइन त्याच्या पेट्रोल आणि डिझेल व्हर्जनसारखेच राहील. परंतु, त्यात 360-डिग्री कॅमेरा, ऑटो पार्क असिस्ट आणि ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल सारखी काही नवीन फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. ही फीचर्स डॅशबोर्डवरील बटणांद्वारे कंट्रोल केली जाऊ शकतात.
टाटा कर्व्ह सीएनजीमध्ये 1.2-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असेल जे 99 बीएचपी आणि 170 एनएम टॉर्क निर्माण करते. सीएनजी किटसह, पॉवर आणि टॉर्कमध्ये किरकोळ बदल केले जाऊ शकतात. हे इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स या दोन्ही पर्यायांसह उपलब्ध असेल.
टाटा मोटर्स त्यांच्या नवीन ट्विन-सिलेंडर टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे, त्यामुळे बूट स्पेसमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ही टेक्नॉलजी प्रथम अल्ट्रोज सीएनजीमध्ये दिसली होती आणि आता ती कर्व्ह सीएनजीमध्ये देखील वापरली जाणार आहे.
500 KM ची रेंज देणारी Tata ची EV म्हणजे कमालच ! मिळत आहे आतापर्यंतचे सर्वात मोठे डिस्कॉऊंट
प्रवाशांच्या सुरक्षेच्या बाबतीत, टाटा कर्व्ह सीएनजीमध्ये 6 एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), ब्रेक असिस्ट, 3-पॉइंट सीट बेल्ट आणि डिस्क ब्रेक्स सारख्या फीचर्ससह येतील. याशिवाय, 12.3 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 9-स्पीकर JBL साउंड सिस्टम देखील यामध्ये उपलब्ध असेल.
टाटा कर्व्ह सीएनजी 2024 च्या अखेरीस भारतीय बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे. या कारची अपेक्षित किंमत सुमारे 10 लाख रुपये असू शकते, ज्यामुळे ही कार त्याच्या सेगमेंटमध्ये एक स्पर्धात्मक पर्याय बनेल. परंतु, अद्याप कंपनीने या कारच्या किमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.