फोटो सौजन्य: iStock
भारतीय कार मार्केट झपाट्याने बदलताना दिसत आहे. यातच 2025 मध्ये काही बजेट फ्रेंडली पण ॲडव्हान्स एसयूव्ही आणि हॅचबॅक मॉडेल्स लाँच होणार आहेत. विशेष म्हणजे ही वाहने 35 किमी/लिटर पर्यंत मायलेज, ADAS सेफ्टी फिचर आणि हायब्रिड इंजिन यासारख्या फीचर्ससह येणार आहे. चला या आगामी काळात येणाऱ्या कार्सवर एकदा नजर टाकूयात.
टाटा मोटर्स लवकरच भारतीय बाजारात त्यांच्या प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोजचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करणार आहे. या कारची अंदाजे सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 7 लाख रुपये असू शकते. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
नवीन अल्ट्रोज फेसलिफ्टमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये नवीन फ्रंट ग्रिल आणि बंपर, फ्लश डोअर हँडल आणि मागील बाजूस कनेक्टेड एलईडी टेल लाईट बार समाविष्ट आहे. कारच्या आतील भागात 26.03 सेमी ड्युअल एचडी स्क्रीन, अँबियंट लाइटिंग आणि नवीन सीट फॅब्रिक आहे. यासोबतच, सनरूफ, वायरलेस फोन चार्जर, 6 एअरबॅग्ज आणि इन-बिल्ट एअर प्युरिफायर सारखी प्रीमियम फीचर्स देखील त्यात जोडण्यात आली आहेत. ही कार सध्याच्या अल्ट्रोझ मॉडेलसारखीच असेल, म्हणजेच त्यात कोणतेही मोठे टेक्निकल बदल केलेले नाहीत.
Honda कडून आतापर्यंतचा सर्वात महागडा स्कूटर लाँच, किंमत एवढी की दारात उभी राहील Hyundai Creta SUV
ह्युंदाई लवकरच भारतीय बाजारात त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही व्हेन्यूचे नवीन जनरेशन मॉडेल लाँच करणार आहे. ही कार 2025 मध्ये लाँच होईल आणि तिची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची अपेक्षा आहे. नवीन ह्युंदाई व्हेन्यूमध्ये अनेक महत्त्वाचे अपडेट्स देण्यात आले आहेत. यामध्ये नवीन हेडलाइट्स, अपडेटेड फ्रंट ग्रिल आणि टेल लॅम्प डिझाइनचा समावेश आहे. याशिवाय, या कारच्या इंटिरिअरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरॅमिक सनरूफ आणि प्रगत ADAS सेफ्टी सिस्टम जोडण्यात आली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, या कारमध्ये 6 एअरबॅग्ज आणि 360 डिग्री कॅमेरा सारख्या फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, याचे पेट्रोल व्हेरियंट सुमारे 15 किमी/लिटर मायलेज देऊ शकेल आणि डिझेल व्हेरियंट सुमारे 21 किमी/लिटर मायलेज देऊ शकेल.
मारुती सुझुकी लवकरच भारतीय बाजारात हायब्रिड इंजिनसह कूप-स्टाइल एसयूव्ही फ्रॉन्क्स सादर करणार आहे. या अपडेटेड व्हर्जनची सुरुवातीची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी ठेवता येते. फ्रॉन्क्स हायब्रिडमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स दिसतील. यामध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, हेड्स-अप डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल आणि रियर एसी व्हेंट्ससह 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम समाविष्ट आहे. याशिवाय, यात 16 इंच डायमंड कट अलॉय व्हील्स आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञानासारखे फिचर देखील असतील.
सुरक्षिततेसाठी, त्यात ADAS सिस्टम देखील प्रदान केली जाईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात 1.2 लिटरचे Z12E 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन असेल जे कंपनीच्या मते 35 किमी/लिटर पर्यंत मायलेज देईल.
Mahindra Bolero Neo चा बोल्ड एडिशन लाँच, ‘या’ 5 फीचर्समुळे कारचे नशीब पालटणार
महिंद्रा भारतीय मार्केटमध्ये एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक व्हेईकल म्हणून त्यांची नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही XUV 3XO EV लाँच करण्याची तयारी करत आहे. हे वाहन थेट टाटा पंच ईव्हीशी स्पर्धा करणार आहे. .या इलेक्ट्रिक एसयूव्हीची अंदाजे रेंज 400 ते 450 किलोमीटर दरम्यान असेल. या एसयूव्हीमध्ये स्टायलिश डिझाइन आणि ॲडव्हान्स डिजिटल फीचर्स दिले जातील. कंपनी ही इलेक्ट्रिक एसयूव्ही सामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे.