फोटो सौजन्य: @FowlersBikes/X.com
भारतीय बाजारात हाय परफॉर्मन्स बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. त्याचे लूक, त्यांचा परफॉर्मन्स, त्यांचे डिझाइन आणि अशा अनेक गोष्टी बाईक रायडर्सना आकर्षित करत असतात. भारतात अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या विविध सेगमेंटमध्ये बाईक ऑफर करत असतात. तसेच, त्या वेगवेगळ्या डिस्काउंट ऑफर देखील लाँच करत असतात. सध्या BSA मोटरसायकल कंपनीने त्यांच्या बाईकवर डिस्काउंट जाहीर केले आहे. या बाईक खरेदीवर कंपनीकडून कोणत्या प्रकारच्या ऑफर्स दिल्या जात आहेत? आणि ही ऑफर तुमच्यासाठी कशी बेस्ट ठरू शकते? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
BSA भारतीय बाजारपेठेत अनेक विभागांमध्ये बाईक विकतात. GST 2.0 लागू झाल्यानंतर, कंपनीने त्यांच्या 650cc बाईक, गोल्ड स्टारवर एक उत्तम ऑफर दिली आहे.
नुकतेच लाँच झालेली Maruti Victoris फुल टॅंकवर किती KM धावेल? किती असेल मायलेज?
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्र उत्सवाच्या काळात बीएसए मोटरसायकल खरेदीवर ग्राहकांना हजारो रुपयांची बचत होणार आहे. या काळात बाईकची किंमत जीएसटी 2.0 लागू होण्यापूर्वीचीच ठेवण्यात आली आहे.
निर्मात्याने बीएसए गोल्ड स्टार बाइक 3.10 लाख रुपये एक्स-शोरूम किमतीत ऑफर केली आहे. याच्या टॉप व्हेरिएंट बीएसए लिगसी शीन सिल्व्हर ची किंमत 3.45 लाख रुपये एक्स-शोरूम इतकी आहे. याशिवाय, गोल्ड स्टार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लिमिटेड एडिशन ॲक्सेसरीज किट मोफत दिले जाणार आहे.
देशभरात GST 2.0 लागू झाल्यानंतर 350 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या इंजिन असलेल्या बाईक महाग झाल्या आहेत. आधीच्या 28 टक्क्यांऐवजी आता 40 टक्के जीएसटी आकारला जात असल्याने त्यांच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे.
क्लासिक लिजेंड्सचे मुख्य व्यवसाय अधिकारी शरद अग्रवाल म्हणाले, “भारतामध्ये लाँच झाल्यापासून बीएसए गोल्ड स्टारने बाईकला केवळ प्रवासाचे साधन न ठेवता एक लाइफस्टाइल म्हणून आणले आहे. 22 सप्टेंबर 2025 पासून लागू झालेल्या जीएसटी 2.0 नंतर अनेक प्रीमियम ब्रँडने आपल्या किमती वाढवल्या आहेत, मात्र बीएसए ग्राहकांच्या समाधानासाठी वचनबद्ध आहे. सणासुदीच्या काळातील जोशात, देशभरातील अधिकृत बीएसए डीलरशिप त्वरित डिलिव्हरीसाठी सज्ज आहेत. बाईक प्रेमी फक्त 3.10 लाख रुपयांपासून आपली गोल्ड स्टार बुक करू शकतात.”