फोटो सौजन्य: lovindubai (instagram)
बाप-मुलीचं नातं हे प्रेम, विश्वासाने भरलेलं असतं. आपल्या लेकीला चांगलं आयुष्य मिळावं यासाठी प्रत्येक बाप अहोरात्र मेहनत करत असतो. या नात्याचं गोडवे गाणारे अनेक चित्रपट आणि कविता आजवर पाहायला मिळाले आहेत. सोशल मीडियावरही वेळोवेळी असे भावनिक व्हिडिओज समोर येत असतात, जिथे वडील आपल्या मुलीला खास गिफ्ट देताना दिसतात. असाच एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे, ज्यात एका वडिलांनी आपल्या लेकीला थेट Rolls-Royce गिफ्ट केली आहे.
सध्या दुबईमध्ये राहणाऱ्या एका भारतीय बिझनेसमॅनची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. या चर्चेमागील कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या 1 वर्षाच्या मुलीला गुलाबी रंगाची Rolls Royce भेट दिली आहे. दुबईमध्ये राहणाऱ्या या बिझनेसमॅनचे नाव सतीश सानपाल आहे. फादर्स डे निमित्त सतीशने त्याच्या 1 वर्षाच्या मुलीला ही लक्झरी कार भेट दिली आहे.
Tesla Car खरेदी करण्यासाठी आनंदाची बातमी ! July 2025 मध्ये उघडू शकतं पाहिलं शोरूम
सतीश सानपाल हे ANAX Holding चे अध्यक्ष आहेत. ANAX होल्डिंग हा एक मोठा ग्रुप आहे, ज्याची किंमत 3 अब्ज डॉलर्स आहे. या गटात अनेक कंपन्या समाविष्ट आहेत. या गटाची किंमत सुमारे 3 अब्ज डॉलर्स आहे. सतीश यांनी त्यांच्या पत्नीसह रोल्स-रॉइस कारच्या चाव्या मुलगी इसाबेलाला दिल्या, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
दुबईमध्ये राहणारे सतीश संपाल यांनी त्यांच्या १ वर्षाच्या मुलीला गुलाबी रंगाची रोल्स रॉइस भेट दिली, जी कस्टमाइज्ड आहे. या कस्टमाइज्ड रोल्स रॉइसमध्ये, पुढच्या आणि मागच्या सीटवर इसाबेलाचे नाव लिहिलेले आहे आणि सीटवर गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे कव्हर वापरले आहेत.
गुलाबी रंगाच्या रोल्स रॉइस कारवर ‘अभिनंदन इसाबेला’ लिहिलेले आहे आणि एका छोट्या चिठ्ठीत असेही लिहिले आहे की ही कार विशेषतः इंग्लंडमध्ये इसाबेलासाठी बनवण्यात आली आहे. नंतर ही कार UAE मधून इम्पोर्ट करण्यात आली.
वाह रे पठ्ठ्या ! 1 लाखाच्या स्कूटरसाठी खरेदी केली तब्बल 14 लाखांची नंबर प्लेट
भारतात, रोल्स रॉइस कारच्या किमती 6.95 कोटी रुपयांपासून सुरू होतात आणि 10.48 कोटी रुपयांपर्यंत जातात. रोल्स रॉइस कारच्या किमती त्यांच्या मॉडेल आणि स्पेसिफिकेशन्सवर अवलंबून असतात.