फोटो सौजन्य: Pinterest
भारतीय ऑटो बाजारात टाटा मोटर्सची नवीन SUV लाँच झाली आहे. ही एसयूव्ही म्हणजे Tata Sierra. ही एसयूव्ही बाजारात पुन्हा एंट्री मारणार म्हणून कारप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच या कारचे नाव India Book Of Records मध्ये समाविष्ट झाले आहे. मात्र, ही कार खरंच इतका मायलेज देते का?
अलीकडेच टाटा मोटर्सने सादर केलेल्या टाटा सिएराने मायलेज बाबत एक नवीन रेकॉर्ड स्थापित केला. हा विक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदवला गेला आहे. या SUV ने NATRAX ट्रॅकवर एक नवीन मायलेजचा विक्रम प्रस्थापित केला.
माहितीनुसार, इंदूरजवळील NATRAX ट्रॅकवर टाटा सिएराची सुमारे 12 तास टेस्टिंग घेण्यात आली. या काळात, एसयूव्हीच्या विविध टेस्टिंग घेण्यात आल्या, ज्यामध्ये मायलेज टेस्टिंगचा समावेश होता. ज्यात या एसयूव्हीने प्रति लिटर पेट्रोलमध्ये 29.9 किमी मायलेज गाठून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला.
टाटा सिएराने सुमारे 12 तासात 800 किलोमीटरचे अंतर कापले. या कारचा सरासरी वेग ताशी 65 ते 70 किलोमीटर दरम्यान राखला गेला. यामुळे इंजिन कमी आरपीएमवर चालण्यास अनुमती मिळाली, ज्यामुळे इंधन कार्यक्षमता चांगली झाली.
टाटा सिएराने 1 लिटर पेट्रोलवर प्रति लिटर 29.9 किलोमीटर मायलेज दिले असेल. पण सत्य हे आहे की या मायलेजसाठी, ही एसयूव्ही अशा ट्रॅकवर चालवण्यात आली जिथे फक्त एकच वाहन चालत होते. याशिवाय, कार सरळ आणि त्या ट्रॅकवर न थांबता चालवली गेली. या दरम्यान, याचे स्पीड ताशी 65 ते 70 किलोमीटर दरम्यान ठेवण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात, ट्रॅफिक, वळणे, चढण आणि उतार असलेल्या रस्त्यावर ही SUV चालवताना, मायलेज फक्त 18 ते 20 किलोमीटर प्रति लिटर मिळू शकतो.






