फोटो सौजन्य: iStock
आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. मात्र, जेव्हा प्रत्यक्षात आपण कार खरेदी करण्यास जातो तेव्हा Sedan, SUV, Coupe आणि Crossover कार पाहून गोधळात पडून जातो. अशावेळी यामध्ये काय फरक असतो? असा प्रश्न आपसूकच मनात येतो.
अलिकडच्या काळात, भारतीय बाजारात अनेक प्रकारच्या कार उपलब्ध आहेत, ज्या हॅचबॅक, सेडान, एसयूव्ही, एमयूव्ही/एमपीव्ही, कूप, कन्व्हर्टिबल, व्हॅन आणि पिकअप ट्रक म्हणून ओळखल्या जातात. इतक्या साईझ आणि डिझाइनमध्ये या कार्स ओळखणे कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीत, तुम्ही योग्य कार कसे खरेदी करू शकता, त्याबद्दल जाणून घेऊयात.
जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील पहिली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी हा हॅचबॅक कार उत्तम पर्याय ठरू शकतो. खरंतर, हॅचबॅक साईझने लहान असते, जिचे बजेट देखील कमी असते. ही कार चांगला मायलेज देखील देते. लहान कुटुंब असलेल्या लोकांसाठी ही एक किफायतशीर कार आहे, जी तुम्ही दैनंदिन कामासाठी वापरू शकता.
भारतीय बाजारात Citroen C3 Sports Edition लाँच, किंमत फक्त…
जर तुम्हाला जास्त स्पेस, आराम आणि लक्झरी असलेली कार हवी असेल तर सेडान तुमच्या सर्व गरजा पूर्ण करू शकते. ही हॅचबॅकपेक्षा आकाराने मोठी असते. त्यात जास्त बूट स्पेस आणि स्टोरेज आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी देखील हा एक चांगला पर्याय आहे. हॅचबॅकपेक्षा ही कार अधिक आरामदायी असते.
ज्यांना पॉवरफुल कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी एसयूव्ही चांगला पर्याय ठरेल. ही एसयूव्ही खडबडीत रस्त्यांवर तसेच रस्त्यावर जलद गतीने चालवता येते. त्याचा ग्राउंड क्लिअरन्स जास्त आहे, ज्यामुळे ही कार खडबडीत भागात, डोंगरांवर आणि ऑफ-रोडिंग ट्रॅकवर आरामात चालवता येते. यासोबतच, एसयूव्हीमध्ये प्रवाशांसाठी आणि सामान ठेवण्यासाठी चांगली जागा देखील पाहायला मिळते. मोठे कुटुंब असलेल्या लोकांसाठी किंवा भरपूर सामान वाहून नेणाऱ्या लोकांसाठी हे पूर्णपणे योग्य आहे.
ही कार दैनंदिन वापरासाठी योग्य आहे. यामध्ये नियमित कारपेक्षा जास्त प्रवासी आणि सामान सामावून घेता येते. ही मोठ्या कुटुंबासाठी किंवा व्यवसायासाठी वापरली जाऊ शकते. MUV मध्ये अनेक प्रकारच्या सीट्ससह मोठी जागा असते. MUV मध्ये SUV सारखी ऑफ-रोडिंग क्षमता नसते. मात्र, ही कार खूप आरामदायी राईड प्रदान करते.
ही कार त्याच्या हाय स्पीड, स्टायलिश आणि चांगल्या परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. आकर्षक कार आणि उत्तम ड्रायव्हिंग अनुभव हवा असलेल्यांसाठी या ड्युअल डोअर कार परिपूर्ण आहेत. कूपचा आकार दोन लोकांसाठी किंवा एकाच रायडरसाठी योग्य आहे. या कारमध्ये प्रचंड पॉवर, स्पीड आणि उत्तम फीचर्स आहेत.