फोटो सौजन्य: Social Media
देशात अनेक बेस्ट ऑटो कंपन्या आहेत. त्यातीलच एक आघडीची कार उत्पादक कंपनी म्हणजे मारुती सुझुकी. मारुतीने देशात अनेक उत्तम आणि चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर केल्या आहेत. पण आता कंपनी आपल्या सगळ्याच कार्सवर भन्नाट डिस्काउंट देत आहे.
मारुती सुझुकी इंडियाने त्यांच्या नेक्सा डीलरशिपवर विकल्या जाणाऱ्या जवळजवळ सर्व कारवर भन्नाट ऑफर जाहीर केल्या आहेत. कंपनी ज्या कारवर सर्वाधिक सूट देत आहे, त्या यादीत जिमनीचे नाव देखील समाविष्ट आहे. खरंतर, जर तुम्ही या महिन्यात ही ऑफ-रोड एसयूव्ही खरेदी केली तर तुम्हाला 1 लाख रुपयांचा फायदा होईल. कंपनी हा फायदा थेट कॅश डिस्काउंटच्या स्वरूपात देत आहे. लक्षात घ्या, या कारवर एक्सचेंज आणि स्क्रॅपेजसारखे बोनस उपलब्ध नसतील.
मारुती जिम्नीच्या एक्स-शोरूम किमती विविध व्हेरियंटनुसार बदलतात. झेटा व्हेरियंटची किंमत 12,75,500 रुपये आहे, तर अल्फा व्हेरियंटची किंमत 13,70,500 रुपये आहे. याशिवाय, झेटा एटी व्हेरियंट एक चांगला पर्याय म्हणून 13,85,500 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सर्वात महाग आणि प्रीमियम पर्याय म्हणजे अल्फा एटी, ज्याची किंमत 14,80,500 रुपये आहे. लक्षात घ्या, या सर्व एक्स-शोरूम किमती असून त्यांची ऑन-रोड किंमत वेगळी असू शकते.
जिम्नीमध्ये 1.5-लिटर चार-सिलेंडर K15B माइल्ड-हायब्रिड पेट्रोल इंजिन आहे, जे जास्तीत जास्त 105 एचपी पॉवर आणि 134 एनएमचा पीक टॉर्क निर्माण करते. ही कार 5-स्पीड एमटी किंवा 4-स्पीड एटी ट्रान्समिशनसह जोडलेली आहे. यात इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVMS, वॉशरसह फ्रंट आणि रीअर वायपर, डे अँड नाईट IRVM, पिंच गार्डसह ड्रायव्हर-साइड पॉवर विंडो ऑटो अप/डाऊन, रिक्लाइनेबल फ्रंट सीट्स, माउंटेड कंट्रोल्ससह मल्टीफंक्शनल स्टीअरिंग व्हील, TFT कलर डिस्प्ले, फ्रंट आणि रीअर सीट अॅडजस्टेबल हेडरेस्ट, फ्रंट आणि रीअर वेल्डेड टो हुक अशी फीचर्स आहेत.
Hyundai Creta च्या EX व्हेरियंटला घरी आणण्यासाठी 2 लाखाचे डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?
या कारमध्ये स्टील व्हील्स, ड्रिप रेल आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 7 इंचाची स्मार्टप्ले प्रो टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. अल्फा ग्रेड अलॉय व्हील्स, बॉडी कलर डोअर हँडल, वॉशरसह एलईडी ऑटो हेडलॅम्प, फॉग लॅम्प, गडद हिरव्या रंगाची टिंटेड ग्लास, पुश बटण इंजिन स्टार्ट/स्टॉप, क्रूझ कंट्रोल, लेदर स्टीअरिंग व्हील, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 9-इंच स्मार्टप्ले प्रो+ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, आर्कामिस सराउंड साउंड देखील उपलब्ध आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, यात स्टॅन्ड ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, साइड आणि कर्टन एअरबॅग्ज, ब्रेक लिमिटेड स्लिप डिफरेंशियल, EBD सह अँटी-लॉक ब्रेक, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, साइड-इम्पॅक्ट डोअर बीम, आणि इंजिन इमोबिलायझर अशी फीचर्स आहेत.