EV Scooter Vs EV Bike? बॅचलर तरुणांसाठी कोणता पर्याय ठरेल 'व्हॅल्यू फॉर मनी'; खरेदीपूर्वी एकदा वाचाच 'हा' रिपोर्ट ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
EV Scooter vs EV Bike India : आजच्या काळात पेट्रोलच्या किमतीने शंभरी पार केल्यामुळे मध्यमवर्गीय आणि तरुणांचा कल मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांकडे (EV) झुकताना दिसत आहे. विशेषतः बॅचलर्स, म्हणजेच अविवाहित तरुण आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ईव्हीची मोठी क्रेझ पाहायला मिळतेय. पण, शोरूममध्ये गेल्यावर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे ‘ईव्ही स्कूटर घ्यावी की ईव्ही बाईक?’ दिसायला दोन्ही आकर्षक वाटत असली, तरी तुमच्या दैनंदिन गरजांनुसार चुकीची निवड तुम्हाला भविष्यात महागात पडू शकते.
वाहन निवडण्यापूर्वी सर्वात आधी तुम्हाला तुमची रोजची जीवनशैली तपासावी लागेल. जर तुम्ही शहरात राहता, जिथे ट्रॅफिकची समस्या मोठी आहे आणि तुम्हाला दररोज ऑफिस किंवा कॉलेजला जावे लागते, तर इलेक्ट्रिक स्कूटर हा तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो. स्कूटर चालवायला अतिशय सोप्या असतात. त्यात गिअर बदलण्याचा कटकटीचा प्रवास नसतो, त्यामुळे ट्रॅफिकमध्येही तुम्ही विनासायास गाडी चालवू शकता. याशिवाय, स्कूटरमध्ये मिळणारी ‘स्टोरेज स्पेस’ (सीटखालील जागा) बॅचलर्ससाठी खूप फायदेशीर ठरते. तिथे तुम्ही तुमचे हेल्मेट, लॅपटॉप बॅग किंवा किरकोळ सामान सहज ठेवू शकता.
हे देखील वाचा : EV की पेट्रोल कार? ५०० किमी प्रवासासाठी कोणता पर्याय स्वस्त? पाहा खर्चाचे संपूर्ण गणित
| वैशिष्ट्ये | इलेक्ट्रिक स्कूटर | इलेक्ट्रिक बाईक |
| मुख्य वापर | शहर आणि दैनंदिन कामासाठी | लांबचा प्रवास आणि हायवे |
| आराम | अधिक आरामदायक | स्पोर्टी आणि आक्रमक राईड |
| स्टोरेज | डिकीमध्ये भरपूर जागा | स्टोरेजची कमतरता |
| वेग | मध्यम | जलद (High Speed) |
| किंमत | बजेटमध्ये बसणारी | थोडी महाग |
| रेंज | ८० ते १५० किमी | १५० किमी पेक्षा जास्त शक्य |
दुसरीकडे, जर तुम्हाला स्पोर्टी लूक, हाय-स्पीड आणि लांबच्या प्रवासाची (Long Rides) आवड असेल, तर इलेक्ट्रिक बाईक तुमच्यासाठी बनली आहे. आजकालच्या अनेक प्रीमियम इलेक्ट्रिक बाईक्स प्रगत वैशिष्ट्यांनी सज्ज आहेत. त्यांची डिझाईन एखाद्या स्पोर्ट्स बाईकसारखी असते, जी तरुणांना पटकन आकर्षित करते. जर तुमचे कामाचे ठिकाण शहराबाहेर असेल किंवा तुम्हाला विकेंडला महामार्गावर फिरायला जायला आवडत असेल, तर बाईकची स्टेबिलिटी आणि वेग तुम्हाला नक्कीच आवडेल. मात्र, बाईकमध्ये स्टोरेजची कमतरता असते, ही गोष्ट बॅचलर्सनी लक्षात घेणे गरजेचे आहे.
हे देखील वाचा : Range Rover SV च्या किमतीत 75 लाखांपर्यंत कपात! ग्राहकांना मोठा दिलासा
जेव्हा आपण आरामदायी प्रवासाचा विचार करतो, तेव्हा इलेक्ट्रिक स्कूटर बाजी मारते. स्कूटरवर बसण्याची स्थिती (Sitting Posture) अधिक रिलॅक्स असते. पण जर कार्यक्षमतेचा (Performance) विचार केला, तर इलेक्ट्रिक बाईक सरस ठरते. बाईकची रेंज अनेकदा स्कूटरपेक्षा जास्त असू शकते आणि तिची चढणीवर धावण्याची क्षमताही उत्तम असते.
Ans: जर तुम्हाला सामान ठेवण्यासाठी जागा आणि ट्रॅफिकमध्ये सोयीस्कर प्रवास हवा असेल तर स्कूटर उत्तम, आणि जर लूक व स्पीड हवा असेल तर बाईक निवडा.
Ans: पेट्रोल वाहनांच्या तुलनेत ईव्हीचा देखभाल खर्च ५०% ते ७०% पर्यंत कमी असतो कारण यात इंजिन नसते.
Ans: मॉडेलनुसार स्कूटर ८०-१२० किमी आणि बाईक १२०-२०० किमी पर्यंत रेंज देऊ शकतात.






