इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक: १० किलोमीटरपर्यंत उडाली राख, ३ गिर्यारोहकांचा मृत्यू; पहा व्हिडिओ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Mount Dukono Eruption 2026 : निसर्ग जितका सुंदर आहे, तितकाच तो कधीकधी रौद्र आणि भयानक रूप धारण करतो. इंडोनेशियाच्या (Indonesia) हमाहेरा बेटावर वसलेल्या ‘माउंट डुकोनो’ (Mount Dukono) या सक्रिय ज्वालामुखीच्या बाबतीत नेमके हेच घडले आहे. शुक्रवारी सकाळी ७:४१ च्या सुमारास या ज्वालामुखीचा इतका भीषण स्फोट झाला की, त्यातून निघालेली राख आणि धूर चक्क १० किलोमीटर उंचीपर्यंत आकाशात झेपावले. या आकस्मिक संकटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या दुर्घटनेत ३ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे.
स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रमुखांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या स्फोटात ज्या ३ जणांचा बळी गेला आहे, त्यापैकी दोघे सिंगापूरचे नागरिक आहेत, तर एक स्थानिक रहिवासी आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे, अजूनही १० ते २० गिर्यारोहक या पर्वताच्या दुर्गम भागात अडकले असल्याचे मानले जात आहे. बचाव पथके आपला जीव धोक्यात घालून या अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आकाशात पसरलेली दाट राख आणि गरम हवेमुळे बचाव कार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Defense: Russia ‘आऊट’, India ‘इन’! भारतीय विनाशकारी शस्त्रास्त्रांचा आर्मेनियात धुमाकूळ; रशियाची मक्तेदारी संपली?
कोणतीही आपत्ती अचानक येते असे वाटत असले, तरी माउंट डुकोनोच्या बाबतीत प्रशासनाने आधीच सावधगिरीचा इशारा दिला होता. ज्वालामुखीशास्त्र आणि भूवैज्ञानिक आपत्ती निवारण केंद्राने (PVMBG) स्पष्ट केले होते की, १७ एप्रिलपासूनच या परिसरात पर्यटकांना जाण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. ज्वालामुखीच्या मुख्य विवरापासून ४ किलोमीटरचा परिसर ‘नो-गो झोन’ म्हणून घोषित करण्यात आला होता. असे असतानाही, उत्साहाच्या भरात काही गिर्यारोहकांनी या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले आणि ते प्रतिबंधित क्षेत्रात शिरले. याच बेजबाबदारपणामुळे आज या ३ तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Indonesian rescue teams are racing to reach 20 hikers stranded after Mount Dukono erupted on Halmahera island Friday. pic.twitter.com/AltnFFEsVJ — Open Source Intel (@Osint613) May 8, 2026
credit – social media and Twitter
इंडोनेशिया हा जगातील अशा देशांपैकी एक आहे जिथे सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी आहेत. त्यापैकी ‘माउंट डुकोनो’ हा सर्वात धोकादायक मानला जातो. १९३३ पासून हा ज्वालामुखी सातत्याने सक्रिय आहे. यातून नेहमीच विषारी सल्फर डायऑक्साइड वायू आणि राखेचे ढग बाहेर पडत असतात. जरी हा डोंगराळ भाग मुख्य मानवी वस्तीपासून लांब असला, तरी येथील साहसी ट्रेकिंगसाठी जगभरातील पर्यटक येथे येत असतात. यापूर्वी ६ एप्रिल रोजीही येथे लहान प्रमाणात हालचाली झाल्या होत्या, मात्र शुक्रवारचा स्फोट गेल्या काही दशकांतील सर्वात भीषण मानला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Earth Science : दर महिन्याला 2 सेमीने जमिनीखाली खचतंय ‘हे’ शहर; NASA-ISROच्या ‘NISAR’ने वाजवली धोक्याची घंटा
सध्या माउंट डुकोनोला ‘ऑरेंज अलर्ट’ म्हणजेच तिसऱ्या सर्वोच्च सतर्कता पातळीवर ठेवण्यात आले आहे. सुदैवाने, राखेचे लोट हवेत खूप उंच गेल्याने विमान वाहतुकीवर सध्या कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, स्थानिक रहिवाशांना मास्क वापरण्याचे आणि घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इंडोनेशिया सरकार आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग आता उरलेल्या गिर्यारोहकांना वाचवण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करत आहे.
Ans: इंडोनेशियाच्या हमाहेरा बेटावरील 'माउंट डुकोनो' (Mount Dukono) या ज्वालामुखीचा भीषण उद्रेक झाला आहे.
Ans: आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ३ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात २ सिंगापूरचे नागरिक आणि १ स्थानिक व्यक्ती आहे.
Ans: ज्वालामुखीचा स्फोट इतका भीषण होता की राखेचे लोट आकाशात १० किलोमीटर उंचीपर्यंत पसरले होते.






