फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाइल मार्केटमध्ये वेगवेगळ्या वाहनांच्या विक्रीत चांगली वाढ होताना दिसत आहे. तसेच अनेक वाहन उत्पादक कंपन्या स्वस्त किमतीत उत्तम परफॉर्मन्स देणारी वाहनं मार्केटमध्ये लाँच करत आहे, जे ग्राहकांना अधिक आकर्षित करत आहे. तसेच वाहनांवरील लोन सुविधा अधिकच सोपी आणि सोयीस्कर झाल्यामुळे देखील वाहनांच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे.
भारतीय बाजारात लाखांच्या संख्येत वाहनांची विक्री होत आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) कडून दरमहा वाहन विक्रीचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. ज्यामध्ये देशभरात किती वाहने विकली गेली आहेत याची माहिती दिली जाते. जानेवारी 2025 मध्ये देशभरात किती वाहने विकली गेली? प्रत्येक सेगमेंटमधील वाहनांनी मासिक आणि वार्षिक आधारावर कशी कामगिरी केली आहे? या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.
व्हिएतनामच्या ऑटो कंपनीचा भारतात जलवा, Tata Nano पेक्षाही छोटी इलेक्ट्रिक कार करणार लाँच
FADA ने जारी केलेल्या अहवालानुसार, जानेवारी 2025 मध्ये देशभरात एकूण 22,91,621 युनिट वाहनांची विक्री झाली. ज्यामध्ये दुचाकी, तीन चाकी, खाजगी वाहने, कमर्शियल वाहने तसेच ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. अहवालानुसार, दुचाकी विभागात सर्वाधिक विक्री झाली. यानंतर, खाजगी वाहनांची सर्वाधिक विक्री नोंदवली गेली आहे.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालानुसार, देशभरात 15,25,862 दुचाकी विकल्या गेल्या आहेत. यानंतर, खाजगी वाहनांची विक्री 4,65,920 युनिट्सवर पोहोचली. जानेवारी 2025 मध्ये तीन चाकी वाहनांच्या विभागात एकूण 1,07,033 युनिट वाहनांची विक्री झाली. गेल्या महिन्यात 99,425 व्यावसायिक वाहनांची विक्री झाली. ट्रॅक्टर विभागात, गेल्या महिन्यात 93,381 युनिट्स विकल्या गेल्या.
Zepto ला मानला बॉस ! iPhone नंतर आता चक्क करणार ‘या’ लक्झरी कंपनीच्या कारची डिलिव्हरी
FADA च्या अहवालानुसार, महिन्या-दर-महिना आधारावर सर्वाधिक वाढ प्रवासी वाहन विभागात झाली आहे. माहितीनुसार, या विभागात 58.77 टक्के वाढ झाली आहे. त्यानंतर कमर्शियल वाहन विभागाचा नंबर लागतो, ज्यामध्ये 38.04 टक्के वाढ होते. तर दुचाकी विभाग 27.39 टक्क्यांच्या वाढीसह तिसऱ्या स्थानावर राहिला. यानंतर, तीन चाकी वाहनांच्या विभागात 14 टक्के वाढ झाली परंतु ट्रॅक्टर विभागात मासिक आधारावर सुमारे सहा टक्के नकारात्मक वाढ नोंदवली गेली.
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात देशभरात एकूण 21,49,117 वाहनांची विक्री झाली होती. मासिक आधारावर, या वर्षी जानेवारी महिन्यात 30.47 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी दुचाकी विभागात 14,65,039 युनिट्स विकल्या गेल्या. प्रवासी वाहन विभागात 4,03,300 युनिट्स, तीन चाकी विभागात 1,00,160 युनिट्स, व्यावसायिक विभागात 91877 युनिट्स आणि ट्रॅक्टर विभागात 88741 युनिट्स विकल्या गेल्या.