फोटो सौजन्य: Social Media
भारतीय ऑटो बाजारात वाढत्या इलेक्ट्रिक कार्सच्या मागणीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. ग्राहक देखील इंधनातील सततच्या दरवाढीमुळे आपली पहिली पसंत EV ला दर्शवत आहे. हीच वाढती मागणी पाहून देशातील कार उत्पादक कंपन्या आता इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर लक्षकेंद्रित करत आहे.
देशात अनेक इलेक्ट्रिक कार्स उपलब्ध आहेत. परंतु आजही मार्केटमध्ये एकाच ईव्हीचा सर्वात जास्त बोलबाला असतो, त्या कारचे नाव म्हणजे MG Comet EV. JSW MG मोटर इंडियाने अलीकडेच भारतीय बाजारात अपडेटेड कॉमेट ईव्ही लाँच केली आहे, जी देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. आता मोठी गोष्ट म्हणजे ही स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक कार आणखी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. जर तुम्हीही ही ईव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते.
Mahindra च्या 2 इलेक्ट्रिक एसयूव्हीवर तुटून पडले लोकं, 6 महिन्यांवर पोहोचला वेटिंग पिरियड
एमजी कॉमेट ईव्हीच्या मॉडेल इयर 2024 वर 45000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये 20 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, 20 हजार रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस आणि 5000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे. तुम्हाला हे डिस्काउंट वेगवेगळ्या व्हेरियंटनुसार मिळू शकते.
याशिवाय, एमजी कॉमेट ईव्हीच्या 2025 च्या मॉडेल इयरवर 40 हजार रुपयांचे डिस्काउंट आणि 15 हजार रुपयांपर्यंतचे कॅश डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. या ईव्हीवरील ही ऑफर वेगवेगळ्या व्हेरियंटनुसार देखील बदलू शकते.
एमजी कॉमेट ईव्हीच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने त्यात 17.3 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक दिला आहे. ही कार 42 पीएसची पॉवर आणि 110 एनएमचा टॉर्क निर्माण करते. याशिवाय, या कारमध्ये 3.3 किलोवॅटचा चार्जर देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने ही कार 5 तासांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.
हिट नाही तर सुपरहिट आहे ‘ही’ कार, परफॉर्मन्सच्या बाबतीत भल्याभल्यांना सोडेल मागे
एमजी कॉमेट ईव्हीचे हे ब्लॅकस्टॉर्म व्हर्जन मेकॅनिकली स्टॅंडर्ड मोडसारखेच आहे. या कारमध्ये 17.3 kWh बॅटरी पॅक उपलब्ध आहे. या EV वरील इलेक्ट्रिक मोटर 42 hp पॉवर आणि 110 Nm टॉर्क निर्माण करते. एमजी मोटर्सच्या या इलेक्ट्रिक कारची एमआयडीसी रेंज 230 किलोमीटर आहे. ही एमजीची पहिली इलेक्ट्रिक कार आहे, जी ब्लॅकस्टॉर्म एडिशनसह लाँच करण्यात आली आहे. याशिवाय, एमजीच्या सर्व ICE पॉवर्ड मॉडेल्सच्या ब्लॅकस्टॉर्म व्हर्जन आधीच लाँच करण्यात आले आहेत.
कॉमेट ईव्हीच्या ब्लॅकस्टॉर्म एडिशनमध्ये 10.25-इंच ड्युअल स्क्रीन आहेत, एक इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी आणि दुसरी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी. या कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेचे फीचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये कनेक्टेड कार फीचर्स देखील समाविष्ट आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या कारमध्ये रिअर पार्किंग कॅमेरा आणि ड्युअल एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत.