
Formula 1… म्हणजेच जगातील सर्वात वेगवान, सर्वात महागडी आणि सर्वात प्रतिष्ठित मोटर रेसिंग स्पर्धा. आज F1 चे चाहते जगभरात कोट्यवधींच्या संख्येने आहेत. फेरारी, मर्सिडीज, मॅकलारेन आणि रेड बुलसारखे संघ आज या खेळाचे मोठे चेहरे बनले आहेत. पण या खेळाची सुरुवात नेमकी कशी झाली? पहिली F1 शर्यत कधी झाली? आणि त्या शर्यतीत कोण विजेता ठरलं? आज इथे जाणून घेऊयात.
दुसऱ्या महायुद्धानंतरचं युरोप… युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या देशांमध्ये पुन्हा एकदा जीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू होता. युद्धापूर्वीपासूनच युरोपमध्ये मोटर रेसिंग लोकप्रिय होतं, मात्र युद्धामुळे अनेक स्पर्धा बंद पडल्या होत्या. युद्ध संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय मोटार क्रीडा महासंघ अर्थात FIA ने जगातील सर्वोच्च मोटर रेसिंग स्पर्धेसाठी एक समान नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला. यालाच “फॉर्म्युला” असं नाव देण्यात आलं.
ऑटोमोबाईल क्षेत्रातील करिअरमध्ये हे आहेत चांगल्या पगाराचे जॉब; आजच जाणून घ्या
1946 मध्ये FIA ने “फॉर्म्युला वन” नियमांची घोषणा केली आणि त्यानंतर काही वर्षांच्या तयारीनंतर इतिहासातील पहिली अधिकृत Formula 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप शर्यत आयोजित करण्यात आली. दिनांक 13 मे 1950… इंग्लंडमधील सिल्व्हरस्टोन एअरफिल्ड. दुसऱ्या महायुद्धात लष्करी विमानतळ म्हणून वापरण्यात आलेल्या या ठिकाणी जगातील पहिली F1 ग्रँड प्रिक्स भरवण्यात आली. या स्पर्धेला ब्रिटनचे राजा King George VI, राणी एलिझाबेथ आणि राजघराण्यातील अनेक सदस्य उपस्थित होते.
या ऐतिहासिक शर्यतीत अल्फा रोमिओ संघाचं वर्चस्व पाहायला मिळालं. त्या काळातील प्रसिद्ध इटालियन चालक Giuseppe Farina यांनी आपल्या Alfa Romeo 158 कारमधून प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत विजय मिळवला. विशेष म्हणजे याच फरिनाने पुढे जाऊन इतिहासातील पहिले Formula 1 विश्वविजेतेपदही पटकावलं.
हे आहेत जगातील 10 सर्वात मजबूत आणि महागडे हेल्मेट ब्रँड्स आणि त्यांचे प्रसिद्ध मॉडेल्स! जाणून घ्या
त्या काळातील F1 कार् आजच्या कारच्या तुलनेत खूप साध्या होत्या. सुरक्षा साधनांचा जवळजवळ अभाव होता, चालक हेल्मेट आणि साध्या रेसिंग सूटमध्ये शर्यत पूर्ण करत होते. तरीही वेग, धाडस आणि कौशल्याच्या जोरावर त्यांनी मोटरस्पोर्ट्सचा नवा इतिहास घडवला.
13 मे 1950 रोजी सिल्व्हरस्टोन येथे झालेली ती पहिली शर्यत केवळ एक रेस नव्हती. ती आधुनिक Formula 1 च्या जन्माची सुरुवात होती. आज 75 वर्षांनंतरही F1 जगातील सर्वात प्रतिष्ठित मोटरस्पोर्ट स्पर्धा मानली जाते आणि त्या पहिल्या ग्रँड प्रिक्सनेच या रोमांचक प्रवासाचा पाया रचला.