हार्दिक पांडयापासून ते संजय दत्तपर्यंत, अनेक सेलिब्रेटींना पडली आहे 'या' कारची भुरळ
भारतात नेहमीपासूनच लक्झरी कार्सची जबरदस्त क्रेज पाहायला मिळते. सर्वसामन्यांपासून ते दिग्गज मंडळींपर्यंत अनेकांना लक्झरी कार्स प्रचंड आवडत असतात. आपल्याकडे कित्येक सेलिब्रेटीज लक्झरी कारमधून प्रवास करताना दिसतात. भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अनेक लक्झरी कार उत्पादक कंपनीज आहेत, ज्या आपल्या विशेष आणि हाय परफॉर्मन्स कारसाठी ओळखल्या जातात. परंतु यातही एक कंपनी अशी आहे ज्याच्या कार्स तुम्हाला प्रत्येक स्टार्सकडे दिसतेच. लँड रोव्हर असे या कंपनीचे नाव आहे.
भारतात लँड रोव्हरच्या कार अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. स्पोर्ट्स स्टार्सपासून बॉलिवूडपर्यंत अनेक बड्या व्यक्तींनी या कंपनीची आलिशान कार खरेदी केली आहे. अलीकडेच हार्दिक पांड्या स्वतः रेंज रोव्हर चालवताना दिसला. बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजप नेत्या कंगना रणौतनेही गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये रेंज रोव्हर विकत घेतली होती. चला जाणून घेऊया, कोणत्या स्टार्सनी ही कार विकत घेतली आहे.
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने यावर्षी रेंज रोव्हर SV खरेदी केली आहे. कार्तिकने या कारचा फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यासोबतच त्याने एक सुंदर कॅप्शनही लिहिले आहे. नवीन कार खरेदी करताना कार्तिकने लिहिले की, आमची रेंज थोडी वाढली आहे. कार्तिक आर्यनने खरेदी केलेल्या या कारची किंमत तब्बल 4.7 कोटी रुपये आहे.
हे देखील वाचा: होंडा कडून देशातील पहिली E85 Flex Fuel बाईक लाँच, किंमत सर्वसामान्यांना परवडणारी
भाजप खासदार कंगना रणौतने रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी LWB विकत घेतले आहे. रेंज रोव्हरच्या या मॉडेलमध्ये पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरियंटचा समावेश आहे. त्याच्या पेट्रोल व्हेरियंटची किंमत 3.08 कोटी रुपये आहे. तर डिझेल पॉवरट्रेन असलेली ही कार 3.61 कोटी रुपयांची आहे. या कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल पॉवरट्रेनसह ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देखील उपलब्ध आहे.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनेही यावर्षी रेंज रोव्हर खरेदी केली आहे. संजय दत्तने आपल्या वाढदिवसाला ही आलिशान कार घरी आणली होती. नवीन कार खरेदी केल्यानंतर अभिनेता स्वतः ही कार चालवताना दिसला.
हार्दिक पांड्याकडेही लँड रोव्हर रेंज रोव्हर आहे. अलीकडेच हार्दिक विमानतळावरून घरी जात असताना रेंज रोव्हर चालवताना दिसला. या रेंज रोव्हरची किंमत 2.36 कोटी रुपये आहे.