1.Royal Enfield Meteor 350
रॉयल एन्फिल्डच्या सगळ्याच बाईक्स आतापर्यंत लोकांनी पसंत केल्या होत्या. पण ही रॉयल एन्फिल्डची मिटियॉर 350 आता gen z ला भुरळ घालत आहे. या बाइक चा एकदम जबरदस्त असा लुक, 38-40km एवढं माइलेज आणि 15 लिटरची इंधनाची कपॅसिटी यामुळे ही बाइक तरुणांमध्ये आपली छाप पाडत आहे. 349.34 cc एवढी इंजिन कपॅसिटी आणि दिसायला जबरदस्त असल्याने कॉलेजकुमारांनी या गाडीचा ध्यासच घेतलाय.
2.Yamha MT- 15 V2
स्पोटर्स बाइकच्या चाहत्यांमध्ये या बाईकने एक वेगळीच हवा केलीय म्हणायला हरकत नाही. बाईक राइडिंग करणाऱ्यांसाठी वेगवान अशी 6 स्पीड गिअर बॉक्स असणारी आणि सस्पेंशनच्या बाबतीत अव्वल आणि 50 ते 55 किमीचं माइलेज म्हणून ही Yamha MT- 15 V2 बाईक Gen z मध्ये फेमस होतेय; तर तीचा स्पोर्टी आणि डॅशिंग लूक त्यात् भरच घालतोय.
Yamaha MT 15 ची ऑन रोड किंमत किती?
3.TVS Ronin
TVS ची ही बाइक फक्त Gen z च नाही तर मिलेनियलस मध्ये ही तेवढीच ट्रेंड मध्ये आहे. जुन्या मोटरसायकलसारख्या गोल आकाराची हेडलाइट; ज्यात आजच्या LED लाइट्स वापरलेल्या आहेत ज्यामुळे या बाईकचं एक वेगळच रुप दिसत आहे. त्यात बाईकच्या ब्रेक्सचे दोन ABS मोड आहेत, ज्यामुळे नेहमीच्या रस्त्यांवर आणि घसरड्या रस्त्यांवर ब्रेक नीट लागण्यासाठीचे फिचर मिळते
4.Kawasaki Ninja 650
कावासाकीच्या सगळ्याच बाइक्स त्याच्या स्पोर्टी आणि वेगळ्या लुकमुळे प्रसिद्ध आहेत. फक्त एकाच रंगामध्ये येणारी ही कावासकी निंजाची बाइक इतर बाईक्स पेक्षा बजेट मध्ये मोठी आहे पण; तिच्या 649 cc च्या इंजिन कपैसिटीपुढे बुकर विसरून जायला पडत आहे. स्पोर्ट्स बाईक्सच्या दुनियेत क्रेझ बनलेली कावासाकी ची ही बाइक सर्वांना आकर्षित करत आहे.
Kawasaki Bikes खरेदी करण्याची गोल्डन संधी! लाखो रुपयांची बचत होणार
5.Honda Unicorn 160
ग्रामीण भागात जास्त आवडीने घेतली जाणारी आणि त्यातल्या त्यात स्वस्त म्हणून होंडा यूनिकॉर्न 160 बरीच पसंत केली जात आहे. छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात आजही फक्त बाईक्स फक्त राइडिंग साठी नव्हे तर अगदी शेतांच्या कामांसाठीही वापरली जाते. त्यामुळे ही बाइकही Gen z मध्ये तेवढीच प्रसिद्ध होत चाललीय.






