ठाण्यातील Viviana Mall मध्ये महिंद्राच्या नवीन EVs चे भव्य अनावरण
विवियाना मॉलमध्ये 7 फेब्रुवारी 2025 रोजी महिंद्रा BE 6 आणि महिंद्रा XEV चे भव्य अनावरण करण्यात आले. या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यात गौतम मोदी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम मोदी, गौतम मोदी ग्रुपच्या संचालक निधी मोदी, लेकशोर मॉल्सचे CPO सुनील श्रॉफ, विवियाना मॉलचे सेंटर हेड संदीप रे आणि महिंद्रा इलेक्ट्रिक डिव्हिजनचे झोनल बिझनेस मॅनेजर अभिषेक इनानी हे सहभागी झाले होते.
मॉलला भेट देणाऱ्या पाहुण्यांना या क्रांतिकारी वाहनांना जवळून पाहण्याची अनोखी संधी मिळाली. त्यांनी विविध आकर्षक उपक्रमांमध्ये भाग घेतला आणि मोफत महिंद्रा ब्रँडेड अॅक्सेसरीज मिळवण्याचा आनंद घेतला. कार प्रेमींसाठी मॉलमध्ये एक विशेष फॉर्म्युला 1 रेसिंग सिम्युलेटर देखील ठेवण्यात आला होता. त्यामुळे ते अत्याधुनिक रेसिंगचा थरार अनुभवू शकले.
FASTag चा वार्षिक पास घेऊ की सतत रिचार्ज करत बसू, काय आहे फायदेशीर?
250 हून अधिक प्रीमियम ब्रँड्सचे केंद्र असलेल्या या मॉलने करमणूक आणि अनुभवात्मक सहभाग घेण्यासाठी व्यासपीठ पुरविले. त्यामुळे उपस्थितांसाठी एक अत्यंत रोमांचक आणि संस्मरणीय वातावरण निर्माण झाले. या अनावरण कार्यक्रमात इंटरअॅक्टिव्ह डिस्प्ले आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या परफॉर्मन्सेसचे सादरीकरण यांचा समावेश होता. त्यामुळे पाहुण्यांना एका शानदार प्रवासाचा अनुभव मिळाला आणि ब्रँडला अधिक आकर्षक आणि संस्मरणीय पद्धतीने सादर करण्यात आले.
महिंद्राच्या इलेक्ट्रिक एसयूव्हीने आराम, लक्झरी आणि शाश्वततेसाठी एक नवा मापदंड प्रस्थापित केला असून भविष्यातील दळणवळणाला स्टायलिश रूप दिले आहे. महिंद्रा BE 6 (Born Electric) हे धाडस, धडाडी आणि अमर्याद शक्यता यांचे प्रतीक आहे. ही 5-सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही अत्याधुनिक डिझाइन आणि उच्च कार्यक्षमतेसह येते. यात अनेक बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये 79 kWh च्या टॉप-टियर बॅटरीसह एकाच चार्जमध्ये 682 किमी पर्यंतची प्रभावी रेंज आहे. त्याचप्रमाणे, महिंद्रा XEV ही पुढील काळातील दळणवळणाचे एक अद्वितीय उदाहरण आहे. यामध्ये 59 kWh (रेंज: 542 किमी) आणि 79 kWh (रेंज: 656 किमी) असे दोन बॅटरी पर्याय उपलब्ध असून त्यायोगे एक अप्रतिम ड्रायव्हिंग अनुभव मिळतो.
भारतातील पहिली बुलेटप्रूफ Rolls-Royce Cullinan अंबानींच्या दारात; किंमत जाणून थक्क व्हाल
महिंद्राची इलेक्ट्रिक कार BE6 च्या बेस मॉडेलची किंमत 18.90 लाख रुपयांपासून सुरु होते, तर टॉप मॉडेलची किंमत 26.90 लाख रुपयांपर्यंत जाते. जेव्हा ही कार महिंद्राने लाँच केली होती, तेव्हा त्याच्या लूकने कारप्रेमींचे लक्ष वेधले होते. या कारकडे पाहिल्यावर एक वेगळाच क्लासी लूकची झलक पाहायला मिळते. फ्यूचरिस्टिक डिझाइनसह ही कार लाँच करण्यात आली होती.