फोटो सौजन्य: Pinterest
भारतात अनेक उत्तम बजेट फ्रेंडली बाईक आहेत. Hero Splendor आणि TVS Star City Plus या त्यातीलच दोन बाईक. त्यात GST कमी झाल्याने या बाईक अजूनच स्वस्त झाल्या आहेत. चला या दोन्ही बाईकच्या किमती जाणून घेऊयात.
हिरो स्प्लेंडर प्लसची सध्याची एक्स-शोरूम किंमत 73,903 रुपये आहे. तर, टीव्हीएस स्टार सिटी प्लसची किंमत सुमारे 72 ,500 (एक्स-शोरूम) रुपये आहे. चला या बाईक्सच्या इंजिन, परफॉर्मन्स आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.
हिरो स्प्लेंडर प्लस एका लिटर पेट्रोलवर अंदाजे 70-73 किलोमीटर अंतर कापू शकते. बाईकच्या इंधन टाकीची क्षमता 9.8 लिटर आहे, ज्यामुळे ती एका पूर्ण टाकीवर अंदाजे 700 किलोमीटर आरामात प्रवास करू शकते. कमी किमतीत उत्कृष्ट मायलेजसाठी ही बाईक खूप लोकप्रिय आहे.
हिरो स्प्लेंडर प्लस ही सर्वात फ्युएल एफिशियंट बाईक्सपैकी एक आहे. एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर, OHC इंजिनद्वारे समर्थित, स्प्लेंडर प्लस 8000 आरपीएम वर 5.9 किलोवॅट पॉवर आणि 6000 आरपीएम वर 8.05 एनएम टॉर्क निर्माण करते. यात प्रोग्राम केलेले इंधन इंजेक्शन सिस्टम देखील आहे.
TVS कंपनीच्या बाईक उत्तम मायलेजमुळे ग्राहकांमध्ये नेहमीच लोकप्रिय राहिल्या आहेत. TVS Star City Plus ही बाईक BS-6 इंजिनसह येते. यात 109 cc क्षमतेचे इंजिन आणि 4-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. मायलेजबाबत सांगायचे झाल्यास, ही बाईक सुमारे 70 किलोमीटर प्रति लीटर इतके मायलेज देऊ शकते.
या बाईकचे इंजिन 7,350 RPM वर 8.08 bhp कमाल पॉवर आणि 4,500 RPM वर 8.7 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिनला 4-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. बाईकमध्ये 17 इंचाचे व्हील देण्यात आले असून त्यावर ट्युबलेस टायर्स आहेत. किंमत, फीचर्स आणि मायलेज यांची तुलना करून तुम्ही तुमच्यासाठी योग्य अशी बाईक निवडू शकता.
एकूणच, दैनंदिन वापर, जास्त मायलेज आणि कमी खर्च यासाठी Hero Splendor Plus योग्य आहे, तर थोडा जास्त परफॉर्मन्स आणि आधुनिक फीचर्स हवे असतील तर TVS Star City Plus निवडणे फायदेशीर ठरेल.






