फोटो सौजन्य: @Prahlad05336874 (X.com)
भारतीय ऑटो बाजारात सध्या इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आहे. पर्यावरणपूरक आणि इंधन बचतीचे फायदे लक्षात घेता ग्राहकांचा ओढा इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढला आहे. विशेषतः इलेक्ट्रिक दुचाकींची लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्याच्या कमी खर्च, देखभाल सुलभता आणि शहरी भागात सहज वापरामुळे इलेक्ट्रिक दुचाकी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात आहेत. ही वाढती मागणी लक्षात घेता अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक मॉडेल्सच्या डिझाइन आणि उत्पादनावर विशेष भर देत आहेत. त्यामुळेच बाजारात दर महिन्याला नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि बाईक्स लाँच होत आहेत.
नुकतेच, हिरो मोटोकॉर्पने त्यांच्या विडा रेंज अंतर्गत येणाऱ्या नवीन Hero Vida VX2 इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल्सचा टिझर रिलीज केला आहे. हा स्कूटर येत्या 1 जुलै 2025 रोजी भारतीय बाजारात लाँच केला जाणार आहे. कंपनीची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खास कुटुंबासाठी डिझाइन करण्यात आली आहे आणि त्यात सध्याच्या V2 लाइन-अप पेक्षा वेगळी स्टाईलिंग आणि फीचर्स देखील असतील. मात्र, त्यात आढळणारे अंतर्गत कंपोनंट्स दोन्हीमध्ये सारखेच राहण्याची अपेक्षा आहे. Vida VX2 इलेक्ट्रिक स्कूटरचे डिझाइन, फीचर्स आणि किंमत काय असू शकते? त्याबद्दल जाणून घेऊयात.
नवीन टीझरनुसार, या स्कूटरच्या डिझाइनबद्दल हलकीफुलकी माहिती मिळाली आहे. फॅमिली ओरिएंटेड असलेल्यांना आकर्षित करण्यासाठी ही स्कूटर डिझाइन करण्यात आली आहे. लहान TFT डिस्प्ले, फिजिकल की स्लॉट, फ्लॅट, सिंगल-पीस सीट, वेगवेगळे स्विचगियर असे बदल त्यात दिसून आले आहेत.
Vida VX2 चे डिझाइन आणि फीचर्स V2 पेक्षा वेगळे असतील, परंतु बॅटरी, मोटर, चेसिस आणि इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या गोष्टी दोन्हीमध्ये सारख्याच दिसतील. ही स्कूटर अनेक बॅटरी कपॅसिटी आणि व्हेरियंटसह ऑफर केले जाऊ शकते.
यंदाच्या Festive Season मध्ये Skoda Octavia RS होणार लाँच, ‘एवढी’ असू शकते किंमत?
सध्या, Vida V2 लाइन-अपची एक्स-शोरूम किंमत 74,000 रुपयांपासून सुरू होते आणि 1.20 लाख रुपयांपर्यंत जाते. ही किंमत इतर इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा कमी आहे आणि कंपनी ती इतर इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा कमी किमतीत आणू शकते, ज्यामुळे इतर इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा ही स्कूटर अधिक परवडणारा ऑप्शन असेल. हिरोच्या Vida रेंजने हळूहळू इलेक्ट्रिक वाहन बाजारात आपले स्थान निर्माण केले आहे आणि दर महिन्याला विक्रीचे आकडे वाढत आहेत.