फोटो सौजन्य: @automobiletamil (X.com)
भारतासह जगभरात इलेक्ट्रिक वाहनाच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. वाढत्या इंधनाच्या किमतींना रामराम म्हणत अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला प्राधान्य देत आहे. ग्राहकांमध्ये असणारी हीच वाढती मागणी लक्षात घेत अनेक वाहन उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनं लाँच करत आहे. यातच इलेक्ट्रिक बाईक्सना चांगली मागणी मिळताना दिसत आहे. नुकतेच होंडा या आघाडीच्या वाहन उत्पादक कंपनीने त्यांची पहिली वाहिली इलेक्ट्रिक बाईक चीनमध्ये लाँच केली आहे.
होंडाने त्यांची बहुचर्चित पहिली इलेक्ट्रिक बाईक Honda E-VO सादर केली आहे. ही बाईक चीनमध्ये लाँच करण्यात आली असून स्थानिक कंपनीच्या मदतीने ती विकसित करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये ही होंडाची पहिली बाईक आहे, ज्यामध्ये मजबूत रेंज, आधुनिक फीचर्स आणि फ्यूचरिस्टिक डिझाइन आहे.
महिंद्राच्या ‘या’ SUV ची बातच न्यारी ! बनली Dolby Atmos असणारी जगातील पहिली कार
Honda E-VO चे डिझाइन स्पोर्टी स्ट्रीटफायटर बाईकसारखे आहे, जे तरुणांना आकर्षित करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. याचे पुढचे चाक 16 इंच आणि मागील चाक 14 इंच आहे, जे सेमी-स्लिक टायर्सने सुसज्ज आहेत. बेस मॉडेलमध्ये बाईकचे वजन 143 किलो आणि हाय-रेंज मॉडेलमध्ये 156 किलो आहे. ही ब्लॅक आणि व्हाइट रंगाच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे, ज्यामध्ये 7-इंच डिजिटल टीएफटी डॅशबोर्ड देखील समाविष्ट आहे.
बॅटरी आणि रेंजबद्दल बोलायचे झाले तर, Honda E-VO मध्ये दोन बॅटरी पर्याय देण्यात आले आहेत. पहिला व्हेरियंट 4.1kWh क्षमतेची बॅटरीसह येतो, जो 120 किमीची रेंज देतो. ही बाईक 1 तास 30 मिनिटांत चार्ज होते. दुसऱ्या हाय-रेंज व्हेरियंटमध्ये 6.2kWh बॅटरी आहे, जी एका चार्जमध्ये 170 किमी पर्यंत धावू शकते आणि 2 तास 30 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होते. दोन्ही व्हेरियंट पोर्टेबल एसी चार्जरने चार्ज करता येतात.
Jeep Cherokee चा होणार कमबॅक ! नव्या डिझाइनसह मिळणार महत्वाच्या प्रीमियम फीचर्स
परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाले तर, होंडा ई-व्हीओमध्ये इलेक्ट्रिक मोटर आहे जी 20.5 बीएचपीची टॉप पॉवर जनरेट करते, जी एक फास्ट रायडिंग अनुभव देते. त्यात इको, नॉर्मल आणि स्पोर्ट सारखे रायडिंग मोड आहेत. बाईकमध्ये ड्युअल-चॅनेल एबीएस, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (टीपीएमएस) आणि बॅटरी एसओसी डिस्प्ले सारखी फीचर्स देखील आहेत, जे तंत्रज्ञानाच्या बाबतीत पुढे ठेवतात.
या बाईकची किंमत चीनमध्ये CNY 30,000 ते CNY 37,000 दरम्यान ठेवण्यात आली आहे, जी भारतीय चलनात सुमारे 3.56 लाख ते 4.39 लाख दरम्यान येते. या किमतीत अनेक प्रीमियम फीचर्स आणि रेंज इलेक्ट्रिक टू-व्हीलर रेंजमध्ये उपलब्ध आहेत.
सध्या, भारतात Honda E-VO लाँच करण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. हे मॉडेल स्थानिक पार्टनरसह चीनसाठी डिझाइन केले आहे. मात्र, भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी विभाग वेगाने वाढत आहे आणि भविष्यात ही बाईक एंट्री मारण्याची देखील संभावना आहे.
जर होंडा ई-व्हीओ भारतात लाँच झाली तर ते TVS iQube, Ola S1 Pro आणि Ather 450X सारख्या इलेक्ट्रिक दुचाकींना जोरदार स्पर्धा देईल.