फोटो सौजन्य: Social Media
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आपला नाविन्यपूर्ण डिजिटल रोड सेफ्टी लर्निग प्लॅटफॉर्म ई-गुरूकुल लाँच केला. याप्रसंगी रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. हा उपक्रम भारतातील रस्ता सुरक्षिततेच्या संस्कृतीला चालना देण्याप्रती एचएमएसआयच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे ई-गुरुकुल नेमके आहे तरी काय? चला याबद्दल जाणून घेऊया.
ई-गुरूकुल प्लॅटफॉर्म तीन विशिष्ट वयोगटांसाठी डिझाइन करण्यात आलेले प्रशिक्षण मॉड्यूल्स देतो, ज्यामधून रस्ता सुरक्षा शिक्षणाप्रती सर्वसमावेशक दृष्टिकोनाची खात्री मिळते.
५ ते ८ वर्ष वयोगटासाठी: ७-मिनिट मॉड्यूल
९ ते १५ वर्ष वयोगटासाठी: ९-मिनिट मॉड्यूल
१६ ते १८ वर्ष वयोगटासाठी: ७-मिनिट मॉड्यूल
सध्या, मॉड्यूल्स कन्नड, मल्याळम, हिंदी, तेलुगु, तमिळ व इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये उपलब्ध आहेत, ज्यामधून सर्वसमावेशकता व प्रादेशिक प्रासंगिकतेची खात्री मिळते. ई-गुरूकुल egurukul.honda.hmsi.in येथे उपलब्ध होऊ शकते. प्लॅटफार्म प्रथम श्रेणीच्या शहरांसाठी लाइव्ह स्ट्रिमिंग, द्वितीय श्रेणीच्या शहरांसाठी डाऊनलोड करता येणारे कंटेंट आणि विविध प्रांतांमध्ये उपलब्धतेच्या खात्रीसाठी बहुभाषिक मॉड्यूल्स देते.
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या एचआर अँड अॅडमिनिस्ट्रेशनचे वरिष्ठ संचालक; होंडा इंडिया फाऊंडेशनचे विश्वस्त विनय धिंगारा म्हणाले, “एचएमएसआयच्या सीएसआर दृष्टिकोनामध्ये रस्ता सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. ई-गुरूकुलच्या माध्यमातून आमचा रोड सेफ्टी एज्युकेशन मॉड्युल्स सहजपणे उपलब्ध करून देण्याचा मनसुबा आहे, जे विविध वयोगटासाठी, विशेषत: तरूण वयात रस्ता सुरक्षिततेप्रती सकारात्मक मानसिकता बिंबवण्यासाठी विकसित करण्यात आले आहेत.लाँच करण्यात आलेले ई-गुरूकुल २०५० पर्यंत शून्य वाहतूक अपघाताच्या होंडाच्या जागतिक दृष्टिकोनाप्रती योगदान देण्याच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल आहे.
ई-गुरूकुलचे लाँच मुले, शिक्षक व डिलर्सना सुरक्षित रस्ता पद्धतींना प्राधाान्य देण्यास सक्षम करण्याच्या एचएमएसआयच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग आहे. हा उपक्रम प्रत्येक राज्यातील शाळांमध्ये राबवण्यात येईल, विविध वयेागटासाठी डिझाइन करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा शिक्षणाला चालना देण्यात येईल. ही माहिती मिळवण्यास इच्छुक असलेली कोणतीही शाळा येथे Safety.riding@honda.hmsi.in संपर्क साधू शकते.
२०२१ मध्ये, होंडाने वर्ष २०५० साठी आपल्या जागतिक दृष्टिकोन स्टेटमेंटची घोषणा केली, जेथे कंपनी होंडा मोटरसायकल्स व ऑटोमोबाइल्सचा समावेश असलेले शून्य वाहतूक अपघातासाठी प्रयत्न करेल. भारतात, एचएमएसआय या दृष्टिकोनाशी, तसेच २०३० मध्ये अपघातांचे प्रमाण निम्मे कमी करण्याच्या भारत सरकारच्या निर्देशाशी बांधील राहत काम करत आहे.
हे ध्येय संपादित करण्यामधील महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे वर्ष २०३० पर्यंत मुलांमध्ये रस्ता सुरक्षिततेप्रती सकारात्मक मानसिकता विकसित करणे आणि त्यानंतर देखील त्यांना जागरूक करत राहणे. शाळा व कॉलेजमध्ये रस्ता सुरक्षिततेची शिक्षण जागरूकता निर्माण करण्यासोबत तरूणांमध्ये रस्ता सुरक्षिततेबाबत जागरूकता देखील निर्माण करेल आणि त्यांना रोड सेफ्टी अॅम्बेसेडर्स बनवेल.