फोटो सौजन्य: @CMOMaharashtra (X.com)
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार्सना चांगली मिळत आहे. याच मागणीमुळे पूर्वी ज्या कंपन्या फक्त इंधनावर चालणाऱ्या कार उत्पादित करत होत्या, त्याच आज इलेक्ट्रिक कार्स उत्पादित करत आहे. एवढेच नव्हे तर भारतातील इलेक्ट्रिक वाहनासाठी असणारे अनुकूल वातावरण देखील अनेक विदेशी ऑटो कंपन्यांना भारतात आपली उत्पादने लाँच करण्यास प्रोत्साहित करत आहे. अशातच आज अखेर टेस्लाने भारतात त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे.
टेस्लाने 15 जुलै 2025 रोजी मुंबईतील बीकेसी येथे पहिले शोरूम उघडले आणि त्यांची सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कार Model-Y लाँच केली. त्याची सुरुवातीची किंमत ₹59.89 लाख एक्स-शोरूम ठेवण्यात आली आहे.
25 हजारांच्या पगारात सुद्धा खरेदी करता येईल Royal Enfield Hunter 350, असा असेल हिशोब
या ब्रँडचा पहिला शोरूम मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये उघडण्यात आला आहे. भारतात, मॉडेल Y दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल, पहिला RWD असेल आणि दुसरा लॉन्ग रेंज RWD असेल. याच्या टॉप व्हेरिएंटची म्हणजेच लॉंग रेंजची किंमत ₹67.89 लाख एक्स-शोरूम आहे. ही कार सध्या 22,220 रुपयांना बुक करता येते, जे नॉन रिफंडेबल असते. बुकिंग केल्यानंतर 7 दिवसांच्या आत तुम्हाला 3 लाख रुपये अधिक द्यावे लागतील, तरच बुकिंग कन्फर्म झाल्याचे मानले जाईल.
भारतात आलेल्या Model Y कार टेस्लाच्या शांघाय प्लांटमधून आयात करण्यात आल्या आहेत. टेस्ला भारतात कार बनवत नसल्याने, सरकार सध्या त्यावर इम्पोर्ट ड्युटी लावणार आहे. भारतातील नियमांनुसार, जर $40,000 पेक्षा कमी किमतीचे Completely Built-Up Unit (CBU) आयात केले तर त्यावर सुमारे 70% टॅक्स भरावा लागतो. अशा प्रकारे, प्रत्येक टेस्ला कारवर 21 लाख रुपयांपेक्षा जास्त इम्पोर्ट ड्युटी लावण्यात आली आहे. अशा प्रकारे, एका कारमधून सरकारला सुमारे 21 लाख रुपये मिळतील.
भारतात Kia Carens Clavis EV लाँच, मिळणार 490km ची दमदार रेंज, किंमत…
टेस्ला कारवर इम्पोर्ट ड्युटी लावल्याने कारची किंमत वाढली आहे. परंतु, ही कार भारतापेक्षा अमेरिका आणि चीनमध्ये स्वस्त आहे. याचे कारण म्हणजे अमेरिका आणि चीनमध्ये टेस्ला कार बनवल्या जातात, त्यावर वेगवेगळे टॅक्स देखील आहेत. उदाहरणार्थ, अमेरिकेत मॉडेल वायची सुरुवातीची किंमत सुमारे 38.63 लाख रुपये आहे. हीच किंमत चीनमध्ये सुमारे 31.57 लाख रुपयांना उपलब्ध आहे. इतकेच नाही तर जर्मनीमध्येही त्याची किंमत सुमारे 46.09 लाख रुपये आहे.