भारतात Kia Carens Clavis EV लाँच, मिळणार 490km ची दमदार रेंज, किंमत...
किया इंडियाने आपली पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक व्हेईकल कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही भारतात अधिकृतपणे सादर केली आहे. ही इलेक्ट्रिक SUV ₹17.99 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि चार वेगवेगळ्या व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. दिल्ली, मुंबई आणि गुरुग्रामसारख्या प्रमुख शहरांमध्ये विक्रीस उपलब्ध असलेल्या या कारची डिलिव्हरी कंपनी 2025 च्या तिसऱ्या तिमाहीपासून सुरू करणार आहे.
ही इलेक्ट्रिक SUV दोन बॅटरी पर्यायांमध्ये येते: 51.4kWh kWh (एआरएआय-प्रमाणित 490 किमी रेंज) आणि 42 kWh (एआरएआय-प्रमाणित 404 किमी रेंज). 100 kW डीसी फास्ट चार्जरच्या सहाय्याने फक्त 39 मिनिटांमध्ये 10% ते 80% पर्यंत चार्ज करता येते. आयपी67 प्रमाणित बॅटरी पॅक आणि लिक्विड-कूल्ड थर्मल मॅनेजमेंट सिस्टीममुळे ही कार भारतातील अत्यंत उष्ण हवामानातही उत्तम कामगिरी करते.
आली रे आली Tesla आली ! 622KM रेंज, 15 मिनिटात चार्जिंग, जाणून घ्या प्रत्येक व्हेरिएंटची किंमत
प्रगत फीचर्समध्ये पॅडल शिफ्टर्ससह चार लेव्हल्सचे रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, स्मार्ट ऑटो मोड आणि आय-पेडल ड्रायव्हिंगचा समावेश आहे. यामुळे शहरी भागातील ‘वन-पेडल’ ड्रायव्हिंग सहज शक्य होते. अॅक्टिव्ह एअर फ्लॅप्समुळे बॅटरी थंडी राखली जाते आणि कारची अॅरोडायनॅमिक कार्यक्षमता वाढते.
या कारमध्ये 67.62 सेमी ड्युअल पॅनोरॅमिक डिस्प्ले, बोस साउंड सिस्टीम, वन-टच ईजी इलेक्ट्रिक टम्बल सीट्स, 64 कलर अॅम्बियंट लायटिंग, ड्युअल पेन सनरूफ आणि स्मार्ट एअर प्युरिफायरसह इंटीरियर डिझाइन आहे. याशिवाय, 200 मिमी ग्राउंड क्लीयरन्स आणि 43.18 सेमी क्रिस्टल-कट अलॉय व्हील्ससह ही SUV आकर्षक लुक देणारी आहे.
10 लाखांच्या बजेटमध्ये ‘या’ 3 CNG Car असेल तुमच्यासाठी परफेक्ट, किंमत फक्त…
सुरक्षिततेच्या दृष्टीने कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही ही ADAS लेव्हल 2 तंत्रज्ञानाने सज्ज आहे, ज्यामध्ये स्मार्ट क्रूझ कंट्रोल, लेन कीपिंग असिस्ट, फ्रंट कोलिजन अव्हॉइडन्स, ब्लाइंड स्पॉट वॉर्निंग, सेफ एग्झिट वॉर्निंग आणि ड्रायव्हर अटेन्शन मॉनिटरिंग यांचा समावेश आहे. शिवाय, 6 एअरबॅग्ज, ईएससी, हिल स्टार्ट असिस्ट, रिअर पार्किंग सेन्सर्स, ISOFIX आणि रिअल ऑक्युपंट अलर्ट यासारखी 18 हाय सेफ्टी फीचर्स आहेत.
कंपनीने भारतात ११,००० पेक्षा अधिक चार्जिंग पॉइंट्ससह EV इन्फ्रास्ट्रक्चर उभारले आहे. के-चार्ज प्लॅटफॉर्म आणि मायकिया अॅपद्वारे स्मार्ट चार्जिंग आणि मार्ग नियोजन शक्य आहे. तसेच डिजिटल ओनरशिप अनुभव, शेड्युल्ड मेंटेनन्स, वॉरंटी आणि रस्त्यावर मदतीची हमी यामुळे कस्टमर अनुभव अधिक सुलभ आणि आत्मविश्वासपूर्ण बनतो.