फोटो सौजन्य: iStock
भारतामध्ये सणासुदीचा काळ म्हणजे आनंद, शुभमुहूर्त आणि मोठ्या खरेदीचा हंगाम. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर केवळ वाहनाची निवडच नव्हे तर योग्य इन्श्युरन्स पॉलिसीची निवड करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण वाहन इन्श्युरन्स ही केवळ कायदेशीर गरज नसून, तुमचे आणि तुमच्या वाहनाचे अनपेक्षित नुकसानापासून आर्थिक संरक्षण करणारी एक फायनान्शिअल सेफ्टी नेट आहे.
योग्य कव्हरेज असलेली सर्वंकष पॉलिसी घेतल्यास तुम्हाला थर्ड पार्टी नुकसान भरपाई, अपघाती नुकसान संरक्षण, रस्त्यावर बिघाड झाल्यास सहाय्य अशा अनेक फायद्यांचा लाभ मिळतो.
पूर्वी वाहन इन्श्युरन्स घेण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आणि गोंधळात टाकणारी होती. पण आता PhonePe च्या डिजिटल-प्रथम आणि पारदर्शक सोल्यूशन्समुळे ही प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि परवडणारी झाली आहे.
GST कमी झाल्यानंतर ‘ही’ लोकप्रिय बाईक आरामात यईल तुमच्या बजेटमध्ये, किंमत 73 हजार रुपयांपासून सुरु
फोनपेने सादर केलेले नवे वाहन इन्श्युरन्स सोल्यूशन हे पारंपरिक डीलरशिप प्लॅनपेक्षा अधिक किफायतशीर ऑनलाइन पर्याय देते. यामुळे तुम्ही फोनपे ॲपवरूनच विविध इन्श्युरन्स कंपन्यांच्या पॉलिसींची तुलना करून त्वरित योग्य पॉलिसी खरेदी करू शकता.
ही ऑफर फक्त सणासुदीपुरती मर्यादित नाही, तर फोनपे ॲपवर सर्व संभाव्य वाहन खरेदीदारांसाठी कायमस्वरूपी उपलब्ध आहे.
फोनपेने अनेक अग्रगण्य इन्श्युरन्स कंपन्यांशी भागीदारी केली आहे, जेणेकरून ग्राहकांना अधिक पर्याय, सोपी प्रक्रिया आणि संपूर्ण कव्हरेज मिळू शकेल. तसेच, ‘2047 पर्यंत सर्वांसाठी इन्श्युरन्स’ या आयआरडीएआयच्या (IRDAI) दृष्टीकोनाशीही फोनपेचे हे पाऊल सुसंगत आहे.