फोटो सौजन्य: Social Media
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार्स ऑफर करत असतात. यातीलच एक कंपनी म्हणजे टाटा मोटर्स. टाटाने नेहमीच ग्राहकांच्या आवडी आणि मागणीनुसार बेस्ट कार ऑफर केल्या आहेत. ग्राहकांचा देखील कंपनी आणि त्यांच्या कार्सवर चांगला विश्वास आहे.
भारतातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने विविध सेगमेंटमध्ये वाहने विकते. कंपनी टाटा हॅरियरला मिड साइज एसयूव्ही म्हणून ऑफर करते. जर तुम्ही या कारचा बेस व्हेरियंट खरेदी करून घरी आणण्याचा विचार करत असाल, तर फक्त दोन लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, या कारसाठी तुम्ही दरमहा किती ईएमआय देऊ शकता? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी या कारची किंमत जाणून घेऊया.
रेनॉ इंडियाचा ‘रेनॉ. रिथिंक’ ब्रँड परिवर्तनाचा शुभारंभ; चेन्नईत नवीन डिझाईन सेंटरचे उद्घाटन
टाटा मोटर्सने एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा हॅरियर ऑफर केली आहे. त्याच्या बेस व्हेरियंट 15 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येतो. जर तुम्ही ही कार दिल्लीमध्ये खरेदी केली तर त्याची ऑन-रोड किंमत सुमारे 17.40 लाख रुपये होते. या किमतीत, 15 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीव्यतिरिक्त, आरटीओसाठी सुमारे 1.52 लाख रुपये आणि इंश्युरन्ससाठी सुमारे 72 हजार रुपये द्यावे लागतील. टीसीएस चार्ज म्हणून 15 हजार रुपये देखील द्यावे लागेल.
जर तुम्ही या कारचा बेस व्हेरियंट खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवरच फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 15.40 लाख रुपयांची रक्कम मिळवावी लागेल. जर बँक तुम्हाला सात वर्षांसाठी नऊ टक्के व्याजासह 15.40 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा फक्त 24785 रुपये ईएमआय भरावा लागेल.
Tata Tiago EV च्या बेस्ट व्हेरियंटसाठी 1 लाखाचे Down Payment केले तर किती असेल EMI ?
जर तुम्ही बँकेकडून सात वर्षांसाठी नऊ टक्के व्याजदराने 15.40 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 24785 रुपये ईएमआय भरावे लागतील. अशा परिस्थितीत, सात वर्षांत तुम्हाला टाटा हॅरियरसाठी सुमारे 5.41 लाख रुपये व्याज द्यावा लागेल. त्यानंतर या कारची एकूण किंमत ही 22.81 लाख रुपये होईल.
ही कार Tata Safari व्यतिरिक्त, Hyundai Creta, Maruti Grand Vitara, Mahindra Scorpio, Kia Seltos, Honda Elevate सारख्या मिड साइज एसयूव्हींशी थेट स्पर्धा करते.