रेनॉ इंडियाने आपल्या नवीन भारत केंद्रित ब्रँड परिवर्तन धोरण ‘रेनॉ. रिथिंक’ची घोषणा केली आहे. या उपक्रमाअंतर्गत आज चेन्नईमध्ये रेनॉच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठ्या डिझाइन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. ‘डिझाइन इन इंडिया’ दृष्टिकोनास चालना देणारे हे सेंटर भारतीय आणि युरोपियन डिझाइनचा संगम असलेली अभिनव संकल्पना साकारते. या नव्या सेंटरमुळे भारतात रेनॉच्या ‘मेक इन इंडिया’ पाठोपाठ ‘डिझाइन इन इंडिया’ उपक्रमालाही गती मिळणार आहे. कंपनीच्या इंटरनॅशनल गेमप्लॅन २०२७ च्या अंमलबजावणीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
रेनॉ ग्रुपचे चीफ डिझाइन ऑफिसर लॉरेन्स वॅन डेन अॅकर यांनी सांगितले की, “भारत अत्यंत अद्वितीय आणि स्थानिक पातळीवर संचालित बाजारपेठ आहे. समर्पित डिझाइन स्टुडिओ असणे त्यांचे बारकावे जाणून घेण्यासाठी, त्यांच्या गरजा माहित करून घेण्यासाठी आणि त्यांच्या क्षमतांमधून निर्मिती करण्यासाठी आवश्यक आहे. रेनॉ डिझाइन सेंटर चेन्नई भारतातील बाजारपेठेसाठी डिझाइन करण्यात आलेले मॉडेल्स व संकल्पनांवर लक्ष केंद्रित करेल, तसेच रेनॉ ग्रुपच्या जागतिक प्रकल्पांप्रती योगदान देईल. स्थानिक टॅलेंट्स व इनसाइट्सचा फायदा घेत हे सेंटर रेनॉच्या भावी गतीशीलता सोल्यूशन्सना आकार देण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावेल. आरएनटीबीसीआयच्या एक्सलन्स हब म्हणून या सेंटरचे धोरणात्मक लोकेशन देखील फंक्शन्समधील दृढ सहयोगाला आणि आमच्या इंजीनिअरिंग व इनोव्हेशन प्रक्रियांमध्ये डिझाइनच्या जलद एकीकरणाला देखील सक्षम करते”
रेनॉने ९०% स्थानिकीकरण साधत उत्पादन युनिटचे १००% संपादन पूर्ण केले आहे. नव्या डिझाइन सेंटरमध्ये व्हर्च्युअल रिऍलिटी, ३डी एक्स्पो झोन, क्रिएटिव्ह कोलॅबोरेशन स्पेस यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आहे.
रेनॉ इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री CEO वेंकटराम मामिल्लापल्ले म्हणाले, “रेनॉ. रिथिंक उपक्रमामुळे आम्ही ब्रँड, प्रॉडक्ट आणि ग्राहक अनुभव नव्या उंचीवर नेणार आहोत.” रेनॉ ग्रुपचे चेन्नईतील आरअँडडी सेंटर हे जागतिक स्तरावरील सर्वात मोठे असून त्यात १०,००० इंजिनिअर्स कार्यरत आहेत. कंपनी २००५ पासून भारतात कार्यरत असून आता भारतातील ऑटोमोबाईल मार्केटमध्ये पुढचा मोठा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे.