Toyota Innova (फोटो सौजन्य - X अकाउंट)
Toyota द्वारे भारतीय बाजारपेठेत अनेक उत्कृष्ट MPVs आणि SUVs ग्राहकांसाठी ऑफर केल्या जात आहेत. टोयोटाच्या वेबसाइटनुसार, या महिन्यात कंपनीच्या काही कार खरेदी करण्यासाठी किती वेळ प्रतीक्षा करावी लागेल? हे त्यांनी सांगितले आहे.
Toyota Innova Hycross
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस Yota ने लक्झरी MPV म्हणून ऑफर केली आहे. या एमपीव्हीला बाजारात खूप मागणी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जर तुम्ही आज इनोव्हा हायक्रॉस बुक केल्यास, तुम्हाला डिलिव्हरीसाठी सुमारे 13 महिने वाट पाहावी लागेल. एमपीव्हीच्या हायब्रिड आवृत्तीसाठी 13 महिन्यांची प्रतीक्षा आहे आणि सहा महिन्यांत सामान्य पेट्रोल आवृत्ती घरी आणली जाऊ शकते असे कंपनीने सांगितले आहे.
Toyota Innova Crysta
इनोव्हा क्रिस्टा टोयोटाने डिझेल इंजिनसह ग्राहकांना ऑफर करण्यात आली आहे. हायक्रॉससोबतच या एमपीव्हीलाही बाजारात मोठी मागणी आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, या एमपीव्हीवरही पाच महिन्यांपर्यंत प्रतीक्षा कालावधी सांगण्यात आली आहे. या प्रतीक्षा कालावधी ही कार तुम्हाला उपलब्ध होऊ शकते.
किती शक्तिशाली इंजिन
इनोव्हा हायक्रॉसच्या पेट्रोल व्हेरियंटमध्ये कंपनी दोन लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन उपलब्ध करून देत आहे. यामुळे MPV ला 172 BHP पॉवर तुम्हाला प्राप्त होऊ शकते. यासोबत कंपनी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स सुद्धा देत आहे. त्याच्या हायब्रिड प्रकारांमध्ये, कंपनी दोन लिटर क्षमतेचे पेट्रोल मजबूत हायब्रिड इंजिन देते, जे त्याला 184 BHP ची शक्ती मिळवून देते. इनोव्हा क्रिस्टा मध्ये कंपनी 2.4 लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन आहे. यामुळे त्याला 150 हॉर्स पॉवर आणि 343 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. हे 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह ही कार ग्राहकांना देण्यात येणार आहे.
किंमत किती आहे
टोयोटाच्या इनोव्हा हायक्रॉसच्या पेट्रोल आवृत्तीची भारतीय बाजारपेठेत एक्स-शोरूम किंमत 18.92 लाख रुपयांपासून सुरू होते. त्याचे पेट्रोल टॉप व्हेरिएंट 21.13 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीवर खरेदी केले जाऊ शकते. यासह, त्याच्या हायब्रिड आवृत्तीची एक्स-शोरूम किंमत 25.97 लाख रुपयांपासून सुरू होते आणि त्याच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 30.98 लाख रुपये आहे. या सगळ्या वैशिष्यसह कंपनी ही कार ग्राहकांना उपलब्ध करून येणार आहे.