फोटो सौजन्य: Social Media
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कारला चांगली मागणी मिळत आहे. म्हणूनच अनेक कंपन्या इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनाकडे आता विशेष लक्ष देताना दिसत आहे. इलेक्ट्रिक कार या पर्यावरणासाठी एक चांगला विकल्प आहे. त्यामुळेच केंद्र आणि राज्य सरकार सुद्धा नागिरकांना EV वापरण्याचा सल्ला देत आहे. पण इलेक्ट्रिक कार विकत घेणे आता अजूनच महाग झाले आहे.
नवीन वर्षात अनेक कार उत्पादक कंपन्यांनी आपल्या कारच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आता ब्रिटिश ऑटो कंपनी MG ने देखील आपल्या इलेक्ट्रिक कारची किंमत वाढवली आहे. ही कार म्हणजे MG Windsor EV.
ब्रिटिश ऑटो ब्रँड एमजीने त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कार विंडसर ईव्हीची किंमत 50,000 रुपयांनी वाढवल्या आहेत. यामुळे आता एमजी विंडसर ईव्ही खरेदी करणे खूप महाग झाले आहे. ही वाढ सर्व व्हेरियंटसाठी लागू असेल आणि ती तात्काळ लागू झाली आहे. आता या ईव्हीची सुरुवातीची किंमत १४ लाख ते १६ लाख रुपये (एक्स-शोरूम) झाली आहे. चला या ईव्हीची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया.
एमजी विंडसर ईव्ही तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. हे एक्साईट, एक्सक्लुझिव्ह आणि एसेन्स व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, ही कार चार सुंदर रंगांच्या पर्यायांमध्ये येते. ही कार क्ले बेज, पर्ल व्हाइट, स्टारबर्स्ट ब्लॅक, टर्कोइज ग्रीन अशा रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
एमजी विंडसर ईव्हीमध्ये 38 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक वापरला जातो, जो एकाच इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेला असतो. ही मोटर 134bhp पॉवर आणि 200Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 331 किमी प्रवास करते.
Skoda Kylaq ची डिलिव्हरी झाली सुरु, बुक करण्याआधी जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
कंपनीने विंडसर ईव्हीसाठी Battery as a Service (BaaS) प्लॅन देखील सादर केले आहेत, जे ग्राहकांना बॅटरी खरेदी करण्याऐवजी सबस्क्रिप्शन आधारावर वापरण्याची परवानगी देतात. खरेदीचा प्रारंभिक खर्च कमी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही योजना उपयुक्त ठरू शकते.
पर्यावरणपूरक पर्याय: एमजी विंडसर ईव्ही विशेषतः पर्यावरणला लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे.
आकर्षक डिझाइन: त्याची डिझाइन प्रीमियम आणि आधुनिक आहे, जी तरुण आणि कुटुंब अशा दोन्ही ग्राहकांना आकर्षित करते.
परवडणारा पर्याय: वाढलेली किंमत असूनही, ही कार अजूनही त्याच्या सेगमेंटमध्ये एक चांगला पर्याय आहे.
इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणाऱ्या ग्राहकांसाठी एमजी विंडसर ईव्ही हा एक उत्तम पर्याय आहे. यात केवळ लांब रेंज आणि उत्तम फीचर्सच नाहीत तर बॅटरी अॅज अ सर्व्हिस सारख्या वैशिष्ट्यांमुळे ही कार अधिक परवडते.