फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात अनेक कंपन्या उत्कृष्ट कार्स ऑफर करतात, विविध सेगमेंटमधील गाड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे भारतात केवळ स्वदेशीच नव्हे, तर अनेक विदेशी ऑटोमोबाईल कंपन्याही सक्रिय आहेत. त्यापैकी एक प्रमुख विदेशी ब्रँड म्हणजे किया मोटर्स, जी आकर्षक डिझाइन, टेक्नॉलॉजी आणि किफायतशीर मॉडेल्सद्वारे ग्राहकांना आकर्षित करते. कियाच्या इकोनॉमी ते प्रीमियम सेगमेंटमधील कार्स भारतीय ग्राहकांच्या गरजांना धरून आहेत, ज्यामुळे बाजारात त्यांची लोकप्रियता सतत वाढत आहे.
कियाने देशात अनेक उत्तम कार्स ऑफर केल्या आहेत. कंपनीच्या कार्सना देखील मार्केटमध्ये दमदार मागणी मिळताना दिसते. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात कंपनी कार्सचे उत्पादन करत असते. नुकतेच कंपनीने एक महत्वाचा टप्पा गाठला आहे.
उद्या लाँच होणार Royal Enfield Hunter 350, मिळू शकते ‘ही’ मोठी अपडेट
किया मोटर्सच्या कार्स, विशेषत: सेल्टोस, सोनेट, आणि नवीन सायरोस, भारतीय ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. कंपनीने आता एक मोठी कामगिरी साधून आंध्र प्रदेशमधील अनंतपूर प्लांटमध्ये 15 लाख युनिट्स उत्पादन पार केले आहे. हे किया मोटर्सच्या भारतीय बाजारातील यशाचे प्रतीक आहे. याशिवाय, कंपनी लवकरच अनेक नवीन मॉडेल्स लाँच करणार आहे, ज्यामुळे ग्राहकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. कियाच्या इनोवेटिव्ह डिझाइन आणि फीचर्समुळे ते भारतातील स्पर्धात्मक ऑटो मार्केटमध्ये अग्रेसर राहिले आहे.
सेल्टोससह भारतीय बाजारपेठेत आल्यापासून, किआने सोनेट, कार्निवल, कॅरेन्स आणि अलीकडेच लाँच झालेल्या सायरोस कॉम्पॅक्ट एसयूव्हीचा समावेश करण्यासाठी त्यांची लाइनअप झपाट्याने वाढवली आहे. 536 एकरमध्ये पसरलेला अनंतपूर प्लांट केवळ देशांतर्गत विक्रीसाठीच नाही तर जगभरातील 90 हून अधिक देशांमध्ये निर्यातीसाठी देखील एक महत्त्वाचा केंद्र आहे.
या निमित्ताने, कियाने 8 मे 2025 रोजी अपडेटेड कॅरेन्स लाँच करण्याची घोषणा केली आहे. नवीन कॅरेन्स स्मार्ट, टेस्टिंग दरम्यान दिसलेल्या नवीन कॅरेन्सच्या स्पाय शॉट्समध्ये रिफ्रेश केलेले फ्रंट फॅसिया, शार्प एलईडी लाइटिंग एलिमेंट्स, नवीन अलॉय व्हील्स आणि एसयूव्हीसारखे स्टॅन्स असे बदल दिसून येतात. त्याच वेळी, नवीन कॅरेन्समध्ये लेव्हल-2 ADAS, 360 कॅमेरा आणि डॅशबोर्डसह सेंटर कन्सोलमध्ये बदल देखील मिळू शकतात.