फोटो सौैजन्य: iStock
भारतात दिवसेंदिवस वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यामुळे आपसूकच रस्त्यांवर वर्दळ वाढत आहे. याचा परिणाम म्हणजे भारतात रस्ते अपघातांच्या घटनेत सुद्धा वाढ झाली आहे. ज्यामुळे दरवर्षी लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशावेळी या रस्ते अपघाताच्या घटना कमी कशा होतील याकडे सरकार बारकाईने विचार करताना दिसत आहे.
भारतातील रस्ते सुरक्षेबाबत नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अलीकडेच या मुद्द्यावर भाष्य केले आहे. तसेच यावेळी ते म्हटले की जगात सर्वाधिक रस्ते अपघात भारतात होतात. ही प्रत्येक नागरिकासाठी चिंतेची बाब आहे आणि हे थांबवण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. चला जाणून घेऊया, भारतात दरवर्षी रस्ते अपघातामुळे किती जणांना आपला जीव गमवावा लागतो.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली होती की भारतात दरवर्षी सुमारे 4.8 लाख रस्ते अपघात होतात ज्यात 1.8 लाख लोकांचा मृत्यू होतो आणि सुमारे 4 लाख लोक गंभीर जखमी होतात. यामध्ये सर्वात जास्त दुचाकी चालक आणि पादचाऱ्यांचा समावेश आहे.
अहवालानुसार, रस्ते अपघातांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला 3% जीडीपीचे नुकसान होते. एवढेच नाही तर, रस्त्यांची खराब रचना आणि अव्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर देखील रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की अनेक अपघात खराब रस्ते आणि चुकीच्या इंजिनिअरिंगमुळे होतात.
सध्या भारत सरकार रस्ते सुरक्षेबाबत मोठ्या सुधारणांवर काम करत आहे. 2030 पर्यंत रस्ते अपघात 50% कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी सरकारकडून अनेक महत्त्वाची पावले उचलली जात आहेत, ज्यात रस्ते सुरक्षा शिक्षण, वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी, रस्त्यांच्या डिझाइनमध्ये सुधारणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश आहे.
Nissan Magnite खरेदी करण्यासाठी किती करावे लागेल Down Payment? ‘एवढा’ असेल EMI?
उद्योग आणि सरकार यांच्यात चांगल्या समन्वयाची गरज आहे असे केंद्रीय मंत्री यांनी अधोरेखित केले आहे. रस्ते सुरक्षेबाबत नवीन योजना आणि प्रगत उपायांचा अवलंब करून आपण अपघातांची संख्या कमी करू शकतो असे त्यांचे मत आहे. यासाठी, जागरूकता मोहिमा आणि सुरक्षा नियमांचे पालन योग्यरीत्या करणे आवश्यक आहे.