ना अदानी ना अंबानी ! 'या' व्यक्तीकडे आहे सर्वात देशातील महागडी Number Plate, किंमत एवढी की दारात उभी राहील नवीन कार
या जगात अनेक जणांचे स्वप्न असते की त्यांच्याकडे स्वतःची लक्झरी कार असावी. अनेक सेलिब्रेटी आणि उच्च वर्गीय लोकांच्या ताफ्यात लक्झरी कार पाहायला मिळतात. अनेकदा आपण लक्झरी कारवर महागडी नंबर प्लेट पाहतो. मात्र, अहमदाबादमधील एका पठ्ठ्याने चक्क एका नंबर प्लेटसाठी 34 लाख रुपयांची बोली लावली आहे.
अनेकांना कोणकोणते छंद असतील हजे सांगता येत नाही. असे अनेक लोक आहेत ज्यांना महागड्या गाड्या खूप आवडतात. काही लोक असे आहेत ज्यांना त्यांच्या गाडीसाठी सर्वात महागडी आणि अनोखी नंबर प्लेट मिळवण्याची आवड असते.
अंबानी आणि अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये येतात हे आपण सर्वेच जाणतो. मात्र, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की महागड्या नंबर प्लेट असणाऱ्या मालकांच्या यादीत दोन्ही उद्योगपतींचा समावेश नाही. चला जाणून घेऊया भारतातील सर्वात महागडी नंबर प्लेट असलेली व्यक्ती आहे तरी कोण?
Toyota Innova Hycross ची झाली Crash Test, B NCAP कडून मिळाली ‘एवढी’ रेटिंग
भारतातील सर्वात महागडी नंबर प्लेट आशिक पटेलच्या टोयोटा फॉर्च्युनरवर लावली गेली आहे. त्याचा वाहनाचा नंबर ‘007’ आहे. या नंबर प्लेटची किंमत तब्बल 34 लाख रुपये आहे. हा नंबर जेम्स बाँड चित्रपटांपासून प्रेरित आहे, ज्यामुळे ही नंबर प्लेट आणखी खास बनते.
आशिक पटेल अहमदाबादचा एक ट्रान्सपोर्टर आहे, त्याने देशातील सर्वात महागड्या नंबर प्लेटसाठी बोली लावली. आशिक पटेलने 39.5 लाख रुपयांना एक नवीन एसयूव्ही खरेदी केली आणि फॅन्सी रजिस्ट्रेशन नंबर 007 साठी 34 लाख रुपयांची बोली लावली.
1 लाखाचं डाउन पेमेंट आणि Kia Sonet ची चावी असेल तुमच्या हातात ! समजून घ्या EMI चा हिशोब
ही नंबर प्लेट जेम्स बाँड चित्रपटांपासून प्रेरित आहे, ज्यामुळे ती आणखी खास बनली आहे. काही लोक त्यांच्या वाहनांना वेगळे दिसण्यासाठी इतकी मोठी रक्कम खर्च करण्यास कसे तयार असतात हाच खरा प्रश्न आहे.
आशिक पटेलकडे अशी अनोखी नंबर प्लेट असणे हे एक सामान्य वाहतूक व्यावसायिक आपले वाहन कसे अनोखे बनवू शकतो याचे उत्तम उदाहरण आहे.