फोटो सौजन्य: iStock
Euro NCAP Safety Rules Changed: पूर्वी कार खरेदी करताना कार खरेदीदार फक्त कारच्या मायलेजकडे लक्ष देत होते. मात्र, बदलत्या काळानुसार ग्राहकांची विचारसरणी बदलली आणि आता आजचा खरेदीदार कार खरेदी करताना त्यातील सेफ्टी फीचर्सकडे सुद्धा लक्ष देत आहे. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्यांनी त्यांच्या कारमध्ये दमदार सेफ्टी फीचर्स समाविष्ट केलेत. तसेच अनेक कंपन्या त्यांच्या कारचे क्रॅश टेस्टिंग देखील करतात. मात्र, सेफ्टी टेस्ट बाबत Euro NCAP (यूरो एनसीएपी) ने काही नियम बदलले आहेत. चला याबद्दल जाणून घेऊयात.
2026 पासून Euro NCAP (युरो एनसीएपी) चे नवे सेफ्टी नियम लागू होणार आहेत, ज्यामुळे कार कंपन्यांसाठी 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणं पूर्वीपेक्षा अधिक कठीण होणार आहे. विशेष म्हणजे, आता कार्समध्ये फिजिकल बटण असणं बंधनकारक ठरणार आहे.
Euro NCAP हे जगभरात सर्वात विश्वासार्ह वाहन सुरक्षा मूल्यांकन करणारे संस्थान मानले जाते. विशेषतः युरोपमध्ये सुमारे 90% ग्राहक कार खरेदी करण्यापूर्वी सेफ्टी रेटिंग पाहतात. त्यामुळेच सर्व उत्पादक आपापल्या कारला 5-स्टार रेटिंग मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. परंतु, आता 2026 साठी जाहीर झालेल्या नव्या नियमांमुळे हे रेटिंग मिळवणं पूर्वीपेक्षा अधिक कठीण होईल.
आत्तापर्यंत अनेक कंपन्या आपल्या कार्समध्ये मोठ्या टचस्क्रीनसह आधुनिक डिझाइन देण्यावर भर देत होत्या. पण आता Euro NCAP च्या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार “सुविधा” पेक्षा “सुरक्षा” अधिक प्राधान्याने घेतली जाणार आहे.
याचा अर्थ असा की, कार्समध्ये असलेले ADAS (Advanced Driver Assistance System) आता प्रत्यक्ष रस्त्याच्या परिस्थितीत अधिक अचूक आणि प्रभावीपणे कार्यरत असणे आवश्यक आहे.
Nissan Magnite SUV चा बेस व्हेरिएंट घरी आणण्यासाठी किती करावे लागेल Down Payment? EMI किती?
युरो एनसीएपीने स्पष्ट केले आहे की 5-स्टार रेटिंग मिळविण्यासाठी वाहनांमध्ये काही आवश्यक कार्यांसाठी फिजिकल बटणे, डायल किंवा स्विच असणे आवश्यक आहे. केवळ टचस्क्रीनवर अवलंबून राहून आता सर्वोच्च रेटिंग मिळणार नाही. अनेक कंपन्यांनी त्यांच्या नवीन मॉडेल्समध्ये जवळजवळ सर्व कार्ये टचस्क्रीनवर हलवली आहेत, परंतु आता त्यांना बटणे पुन्हा सादर करावी लागतील.
Euro NCAP च्या नव्या नियमांनुसार, गाड्यांमध्ये काही महत्त्वाच्या फंक्शनसाठी स्वतंत्र आणि स्पष्ट दिसणारी बटणं असणं अनिवार्य असेल. या फंक्शनमध्ये हॉर्न, टर्न इंडिकेटर, हॅझर्ड लाईट्स, वायपर, इमर्जन्सी SOS आणि इतर अत्यावश्यक नियंत्रणांचा समावेश आहे.
या निर्णयामागील उद्दिष्ट एकच आहे. ते म्हणजे ड्रायव्हरचं लक्ष रस्त्यावर केंद्रीत राहावं, आणि त्याला आवश्यक फंक्शन वापरण्यासाठी टचस्क्रीनकडे पाहण्याची गरज भासू नये. अशाने वाहन चालवताना सुरक्षितता आणि प्रतिसादक्षमता दोन्ही वाढतील.