फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम बाईक उत्पादक कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या आवश्यकता आणि मागणीनुसार बाईक उत्पादित करत असतात. पूर्वी बाईक खरेदी करताना ग्राहक फक्त त्याची किंमत आणि मायलेजवर जास्त लक्षकेंद्रित करत होते. पण आजचा ग्राहक बाईक खरेदी करताना बाईक्सच्या लूककडे सुद्धा लक्ष देतो. म्हणूनच तर भारतात स्पोर्ट बाईक्सची विक्री सुद्धा झपाट्याने वाढताना दिसत आहे.
केटीएम इंडियाने भारतीय बाजारातून त्यांच्या 125 Duke आणि RC 125 बाईक्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने या दोन्ही बाईक्स त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून हटवला आहेत, ज्यामुळे हे मॉडेल्स आता विक्रीसाठी उपलब्ध राहणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. हा निर्णय घेण्यामागचे कारण म्हणजे या बाईक्सची कमी विक्री. केटीएम लवकरच 160 ड्यूक आणि आरसी 160 लाँच करू शकते अशा देखील मार्केटमध्ये अफवा आहेत.
KTM ने 2018 मध्ये भारतात 125 ड्यूक लाँच केली होती. त्यानंतर काही वर्षांनी आरसी 125 लाँच झाली. परंतु, अलिकडच्या काळात 160 सीसी सेगमेंटची लोकप्रियता वाढली आणि यामुळे कंपनी आता 125 सीसी मॉडेलऐवजी 160 सीसी मॉडेल सादर करण्याची योजना आखत आहे.
125 ड्यूक आणि आरसी 125 मध्ये 124.7 सीसी, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन होते जे 14.3 बीएचपी आणि 12 एनएम टॉर्क निर्माण करत होते. त्यात 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला होता, परंतु कमी मागणीमुळे कंपनी आता हे मॉडेल्स बंद करत आहे.
केटीएमने 2025 मॉडेल अंतर्गत नवीन अपडेट्ससह 390 ड्यूक सादर केली आहे. यावेळी क्रूझ कंट्रोल आणि एक नवीन कलर ऑप्शन – एबोनी ब्लॅक जोडण्यात आला आहे. डाव्या हँडलबारवर असलेल्या नवीन स्विचगिअर तंत्रज्ञानाद्वारे क्रूझ कंट्रोल नियंत्रित केले जाऊ शकते.
नवीन केटीएम 390 ड्यूकमधील इंजिन स्पेसिफिकेशन पूर्वीसारखेच ठेवण्यात आले आहे. हे 399 सीसी, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे, जे 44.25 बीएचपी पॉवर आणि 39 एनएम टॉर्क जनरेट करते. पूर्वी त्याचे इंजिन 373 सीसी होते, जे नवीन जनरेशनमध्ये 399 सीसी पर्यंत वाढवण्यात आले. ही बाईक 6-स्पीड गिअरबॉक्स आणि बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टरसह येते.
या बाईकमध्ये उपलब्ध असलेल्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यात 5-इंचाचा TFT डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, क्रूझ कंट्रोल, लाँच कंट्रोल आणि ट्रॅक मोड सारखी फीचर्स आहेत, जी रेसिंग अनुभव सुधारतात. याशिवाय, बाईकमध्ये सुपरमोटो एबीएस आणि कॉर्नरिंग एबीएस फीचर्स देण्यात आले आहेत. यासोबतच, क्विकशिफ्टर आणि सेल्फ-कॅन्सलिंग इंडिकेटर उपलब्ध आहेत. बाईकमध्ये पूर्णपणे अॅडजस्टेबल सस्पेंशन सिस्टीम देखील आहे, ज्यामुळे रायडिंग अधिक सुरळीत होते.