फोटो सौजन्य: iStock
सततच्या वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे अनेक ग्राहक आता इलेक्ट्रिक कार्सच्या खरेदीकडे वळताना दिसत आहे. यामुळे भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार्सच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळेच जगभरातील कार उत्पादक कंपन्या एकामागून एक नवीन कार्स सादर करीत आहेत, ज्यात आधुनिक फीचर्स आणि सेफ्टी फीचर्स पाहायला मिळतात. या इलेक्ट्रिक कार अलीकडेच बाजारात नवीन आणि लोकप्रिय झाल्यामुळे चर्चेत आले आहेत. हीच बाब लक्षात घेत आज आपण जून महिन्यात ट्रेंडिंग असलेल्या 5 इलेक्ट्रिक कार्सबद्दल जाणून घेणार आहोत.
टाटा हॅरियर ईव्ही ही मार्केटमधील लेटेस्ट कार्सपैकी एक आहे, जी आजकाल खूप ट्रेंडिंग आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीची किंमत 21 लाख 49 हजार रुपये एक्स-शोरूम आहे. हॅरियर ईव्हीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे ड्युअल मोटर ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) सिस्टम, ज्यामध्ये पुढची मोटर 158 पीएस (116 kW) आणि मागची मोटर 238 PS (175 किलोवॅट) पॉवर देते.
लेकीसाठी काहीपण ! 1 वर्षाच्या मुलीला बापाकडून गुलाबी कलरची Rolls-Royce गिफ्ट, किंमत…
गेल्या काही महिन्यांपासून एमजी विंडसर ही भारतात सर्वाधिक विक्री होणारी ईव्ही बनली आहे. या कारने टाटा नेक्सॉनलाही मागे टाकले आहे. ही कार दोन बॅटरी पॅकसह येते, ज्यात मोठ्या पॅकसह व्हेरिएंट विंडसर प्रो आहे, जो अलीकडेच लाँच करण्यात आला होता. विंडसरला बॅटरीसह सर्व्हिस पर्याय म्हणून देखील सादर करण्यात आले आहे.
जर आपण ग्लोबल इलेक्ट्रिक कार ब्रँडबद्दल बोललो तर टेस्ला कंपनी बरीच ट्रेंडमध्ये आहे. यामागील कारण म्हणजे अमेरिकन सरकारशी संबंध असल्याने आणि कंपनीच्या भारतातील एंट्रीमुळे टेस्लाच्या कारची चर्चा वाढली.
महिंद्रा बीई6 ही दमदार इलेक्ट्रिक कार आहे, जी XE 9e सह लाँच करण्यात आली होती. ही इलेक्ट्रिक कार तिच्या फ्यूचरिस्टिक डिझाइनमुळे खूप पसंत केली जाते. या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ती 18.90 लाख रुपयांपासून सुरू होते आणि दोन बॅटरी पॅक पर्यायांसह येते.
20 वर्षात 30 लाख लोकांची फॅमिली मेंबर बनली आहे ‘ही’ कार, मिळते 30 Km चा मायलेज
पाचवी कार Mercedes Benz EQS 580 कारला सेलिब्रेशन एडिशन असेही म्हणतात. याचे लिमिटेड एडिशन 50 युनिट्स असेल. नवीन मर्सिडीज बेंझ EQS 580 4Matic ची एक्स-शोरूम किंमत 1.30 कोटी रुपये आहे. या कारला स्टँडर्ड सेडानच्या तुलनेत काही अतिरिक्त फीचर्सही मिळतात.