125cc सेगमेंटमध्ये ‘या’ बाईक्सचा नाद करायचा नाही
नुकतेच झालेल्या GST कपातीमुळे आता 125cc सेगमेंटमधील बाईक्स खरेदी करणे पूर्वीपेक्षा जास्त स्वस्त झाले आहे. या सेगमेंटमध्ये अशा अनेक बाईक्स आहेत ज्या फक्त किफायतशीर नाहीत तर कमी मेंटेनन्स कॉस्ट आणि दमदार परफॉर्मन्ससाठीही ग्राहकांमध्ये ओळखल्या जातात. चला पाहूया अशाच टॉप 5 125cc बाईक्स, ज्या विक्रीच्या यादीत नेहमीच आघाडीवर असतात.
या लिस्टमधील पहिली बाईक म्हणजे TVS Raider 125. ही बाइक त्यांच्यासाठी योग्य आहे ज्यांना स्पोर्टी लूक आणि मॉडर्न फीचर्स दोन्ही आवडतात. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 80,500 रुपये आहे. यात 124.8cc, 3-valve, एअर कुल्ड इंजिन दिले आहे, जो 11.2 bhp पॉवर आणि 11.2 Nm टॉर्क निर्माण करतो. या बाईकचे सस्पेंशन आणि राइड क्वालिटी या दोन्हींचे ग्राहकांकडून विशेष कौतुक होते.
Honda Shine ही भारतातील 125cc सेगमेंटमधील सर्वाधिक लोकप्रिय कम्यूटर बाईकपैकी एक आहे. या बाईकची किंमत 78,538 (Drum Variant) रुपयांपासून सुरू होते, तर Disc Variant साठी 82,898 आहे. यात 123.94cc इंजन आहे जे 10.59 bhp पॉवर आणि 11 Nm टॉर्क देते. होंडा शाइनचा मायलेज 55-65 kmpl दरम्यान असल्यामुळे ही बाईक फ्यूल एफिशियंट पर्याय ठरते.
Honda SP125 ही बाईक स्टायलिश डिझाइन, प्रगत फीचर्स आणि स्मूद राइडिंगसाठी ओळखली जाते.
GST कपातीनंतर याची किंमत आता85,564 रुपयांपासून सुरू होते. यात 123.94cc इंजन असून ते 10.72 bhp पॉवर आणि 10.9 Nm टॉर्क जेनरेट करते. ही बाईक 5-speed gearbox सह येते, ज्यामुळे राइडिंग अनुभव अधिक स्मूद आणि आरामदायी बनतो.
Bajaj Pulsar 125 ही बाईक स्टायलिश, परवडणारी आणि विश्वासार्ह परफॉर्मन्स देणारी आहे. यात 124.4cc, सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे, जे 11.8 PS पॉवर आणि 10.8 Nm टॉर्क जेनरेट करते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 77,295 रुपयांपासून सुरू होते. पल्सरची आयकॉनिक डिझाइन आणि स्पोर्टी अपील या सेगमेंटमध्ये तिचा वेगळा ठसा उमटवतात.
Honda आणणार 1000cc बाईक, स्पोर्ट्स टूरिंग सेगमेंट होणार मोठा धमाका
Hero Glamour X125 ही एक स्टायलिश आणि पावरफुल कम्यूटर बाइक आहे, जी परफॉर्मन्स आणि मायलेजचा उत्तम समतोल राखते. यात 124.7cc, सिंगल सिलेंडर इंजिन, एअर कुल्ड, 4-स्ट्रोक इंजिन देण्यात आला आहे, जो 11.5 bhp पॉवर आणि 10.4 Nm टॉर्क जेनरेट करतो. या बाईकची एक्स-शोरूम किंमत ₹80,510 पासून सुरू होते. ही बाईक Hero च्या विश्वासार्हतेसह आधुनिक डिझाइन शोधणाऱ्यांसाठी योग्य पर्याय आहे.






