फोटो सौजन्य: Social Media
प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीला आपल्याकडे कार असावी असे नेहमीच वाटत असते. पूर्वी कार घेणं हे खूप कठीण काम होते. परंतु आता ईएमआयच्या सोबतीने, अनेक लोकांना आपली आवडती कार घेणे सोपे झाले आहे. कार लोन घेताना, एक ठराविक रक्कम डाउन पेमेंटच्या स्वरूपात देऊ केल्यानंतर आपल्याला काही वर्षांसाठी दरमहा रक्कम बँकेकडे जमा करावी लागते.
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार्स आहेत, ज्या नेहमीच ग्राहकांना भुरळ घालत असतात. त्यातीलच एक कार म्हणजे मारुती सुझुकीची एर्टिगा. मारुती सुझुकीने देशात अनेक उत्तमोत्तम कार्स ऑफर केल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे एर्टिगा.
मार्केटमध्ये नवीन E Scooter लाँच, फक्त 999 होईल बुकिंग, 1 KM चालवण्याचा खर्च फक्त 17 पैसे
भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी एर्टिगा आपल्या परवडणाऱ्या फॅमिली कारसाठी ओळखली जाते. पण प्रत्येक जणांना एर्टिगा विकत घेणे परवडत नाही. अशावेळी कार लोन घेणे हाच उत्तम पर्याय असतो. तुम्हाला ही कार घ्यायची असेल, पण तुमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत, तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त 1 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट भरूनही Ertiga खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला EMI ची संपूर्ण गणित जाणून घ्यावे लागेल. पण त्याआधी या कारची किंमत जाणून घेऊया.
Maruti Suzuki Ertiga CNG ची किंमत 10.78 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. जर तुम्ही ही कार राजधानी दिल्लीतून खरेदी केली तर तुम्हाला या कारवर 1 लाख 12 हजार 630 रुपये आरसी फी आणि 40 हजार 384 रुपयांची विमा रक्कम भरावी लागेल. याशिवाय 12 हजार 980 रुपये अतिरिक्त शुल्क समाविष्ट आहे. अशा प्रकारे Ertiga ची एकूण ऑन रोड किंमत 12 लाख 43 हजार 994 रुपये होईल.
12.43 लाख रुपयांच्या ऑन-रोड किंमतीवर तुम्ही 1 लाख रुपये डाउन पेमेंट दिल्यास, त्यानुसार तुम्हाला 11 लाख 43 हजार 994 रुपयांचे कार लोन घ्यावे लागेल. अशा प्रकारे, तुम्हाला 10 टक्के वार्षिक व्याजदराने दरमहा 24 हजार 306 रुपयांचे एकूण 60 हप्ते भरावे लागतील. एकूण तुम्हाला 3,14,396 रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील.
वर्षाअखेरीस EV खरेदी करणे झाले स्वस्त, ‘या’ कंपन्या देत आहेत आतापर्यंतचे बेस्ट डिस्काउंट
Ertiga चे CNG व्हेरियंट अंदाजे 26.11 किमी प्रति किलो मायलेज देते. कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर त्याचे इंजिन 1.5 लीटर पेट्रोल इंजिनसह येते.
मारुती सुझुकी एर्टिगाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार मार्केटमधील सर्वोत्तम एमपीव्हींपैकी एक मानली जाते. या 7 सीटर कारमध्ये 1462 सीसी पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 101.64 bhp च्या कमाल पॉवरसह 136.8 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच यात मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्यायही आहे. कंपनीच्या मते, ही कार 20.51 किमी प्रति लीटर मायलेज देखील देते.