फोटो सौजन्य: iStock
आपली स्वतःची कार खरेदी करणे हा आयुष्यातील अनेक सुखद क्षणांपैकी एक आहे. पण जेव्हा आपण कार खरेदी करायला जातो तेव्हा कारच्या किंमती व्यतिरिक्त अन्य टॅक्स आणि इंश्युरन्ससाठी वेगळी रक्कम भरावी लागते. यामुळे कारची किंमत एक आणि ती भरताना वेगळीच दिसते. त्यात आता अनेक ऑटो कंपन्यांनी नवीन वर्षात आपल्या कारच्या किंमती वाढवल्या आहेत.
आता देशातील अग्रगण्य कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी पुन्हा एकदा त्यांच्या कारच्या किंमती वाढवणार आहे. जानेवारी २०२५ मध्ये कंपनीने त्यांच्या कार मॉडेल्सच्या किंमती ४ टक्क्यांपर्यंत वाढवल्या होत्या. आता, ऑटोमेकर त्यांच्या किंमती आणखी वाढवणार आहे. वाढत्या इनपुट आणि ऑपरेटिंग खर्चाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या कारच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मारुती सुझुकीच्या लोकप्रिय मॉडेल वॅगन आरच्या किंमतीत १५,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याच वेळी, स्विफ्टच्या किंमतीत ५,००० रुपयांनी वाढवण्यात आली आहे. यासोबतच ब्रेझा आणि ग्रँड विटाराच्या किमतीत २५ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
मारुती सुझुकीच्या एंट्री-लेव्हल स्मॉल कार अल्टो के१० च्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. आता ही कार १९,५०० रुपयांनी महाग झाली आहे. यासोबतच एस-प्रेसोच्या किमतीत ५,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
फायदे ठाऊक असेलच, पण Second Hand Car खरेदी करण्याआधी त्याचे तोटे सुद्धा जाणून घ्या
प्रीमियम कॉम्पॅक्ट मॉडेल बलेनोची किंमत ९ हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. त्याच वेळी, कॉम्पॅक्ट एसयूव्ही फ्रॉन्क्सची किंमत ५ हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. त्याच वेळी, त्याच्या कॉम्पॅक्ट सेडान डिझायरची किंमत १० हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
अल्टो के१० (Alto K10): १९,५०० रुपयांपर्यंत
एस-प्रेसो (S-Presso): ५,००० रुपयांपर्यंत
सेलेरियो (Celerio): ३२,५०० रुपयांपर्यंत
वॅगन आर (Wagon R): १३,००० रुपयांपर्यंत
स्विफ्ट(Swift): ५,००० रुपयांपर्यंत
डिझायर (Dzire): १०,५०० रुपयांपर्यंत
ब्रेझा (Brezza): २०,००० रुपयांपर्यंत
एर्टिगा (Ertiga): १५,००० रुपयांपर्यंत
इको (Eeco): १२,००० रुपयांपर्यंत
सुपर कॅरी (Super Carry): ₹ १०,००० पर्यंत
इग्निस(Ignis) : ६,००० रुपयांपर्यंत
बलेनो (Baleno): ९,००० रुपयांपर्यंत
सियाझ (Ciaz): १,५०० रुपयांपर्यंत
एक्सएल6 (XL6): १०,००० रुपयांपर्यंत
फ्रँक्स (Fronx): ५,५०० रुपयांपर्यंत
इन्व्हिक्टो (Invicto): ३०,००० रुपयांपर्यंत
जिमनी (Jimny): १,५०० रुपयांपर्यंत
ग्रँड विटारा (Grand Vitara): २५,००० रुपयांपर्यंत
ऑटो एक्स्पो 2025 मध्ये मारुती सुझुकीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार सादर केली. यात दोन बॅटरी पॅक आहेत, जे ५०० किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देतील.