फोटो सौैजन्य: iStock
भारतात विविध सेगमेंटमध्ये कार्स ऑफर केल्या जातात. यात बजेट फ्रेंडली कार्सना मोठी मागणी पाहायला मिळते. असे जरी सलते तरी लक्झरी कार्सची एक वेगळीच क्रेझ आहे. यातही लक्झरी कार म्हंटल की अनेकांच्या नजरेसमोर मर्सिडीज बेंझचे नाव येते.
भारतात कित्येक जणांचे स्वप्न असते की आपल्याकडे मर्सिडीज कार असावी. मर्सिडीज-बेंझ ई-क्लास ही भारतातील टॉप सेलिंग लक्झरी कार आहे. या कारची सुरुवातीची किंमत 78.5 लाख रुपये आहे, जी तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे (E 200, E 220d आणि E 450). यासोबतच, नवीन ई-क्लासमध्ये 2.0-लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन आहेत, जे 48-व्होल्ट माइल्ड-हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.
अशा परिस्थितीत, जर तुम्ही EMI वर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी तुम्हाला त्याचे संपूर्ण लोन कॅल्क्युलेशन आणि दरमहा EMI ची संपूर्ण माहिती जाणून घ्यावी लागेल.
भारतात Tesla येण्याअगोदरच ‘या’ महत्वाच्या व्यक्तीने आपल्या पदाचा दिला राजीनामा, नेमकं घडलं काय?
जर तुम्ही मर्सिडीज ई-क्लाससाठी 81.41 लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि ते 9.8% व्याजदराने 60 महिन्यांसाठी परत केले तर तुम्हाला दरमहा तब्बल 2,05,682 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
मर्सिडीज ई 200 व्हेरियंटसाठी 9.8% व्याजदराने 9.05 लाख रुपये डाउन पेमेंट असेल आणि त्याचा महिन्याचा ईएमआय 60 महिन्यांसाठी 1,72,160 रुपये असेल. E 220d व्हेरियंटवरील व्याजदर देखील 9.8% आहे, ज्यामध्ये 9.59 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल आणि दरमहा 1,82,614 रुपयांचा EMI भरावा लागेल. त्याच वेळी, E 450 व्हेरियंटसाठी डाउन पेमेंट 10.65 लाख रुपये केल्यास, त्याचा मासिक EMI 2,02,783 रुपये असेल.
मर्सिडीज-बेंझ ई-क्लासमध्ये 2.0-लिटर पेट्रोल इंजिन (E २००) आहे जे 194 bhp टॉर्क निर्माण करते, 2.0-लिटर डिझेल इंजिन (E 220d) आहे, जे 197 bhp टॉर्क निर्माण करते आणि E 450 व्हेरियंटमध्ये 48-व्होल्ट माइल्ड हायब्रिड सिस्टम आहे. सर्व व्हेरियंटमध्ये 9G ट्रॉनिक ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. माईल्ड-हायब्रिड तंत्रज्ञानामुळे कार सुरळीत चालते. तसेच चांगली इंधन कार्यक्षमता आणि टॉर्क सपोर्ट मिळतो.
फक्त 2 लाखात मिळेल ‘ही’ स्वस्त ७ सीटर कार, असा असेल संपूर्ण EMI चा हिशोब
या कारला ‘मोबाइल बोर्डरूम’ बनवणाऱ्या फीचर्समध्ये MBUX हायपरस्क्रीन सिस्टम, डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह 17-स्पीकर बर्मेस्टर साउंड सिस्टम, अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS), अॅक्टिव्ह अॅम्बियंट लाइटिंग, 360-डिग्री कॅमेरा, पार्किंग असिस्ट, पॅनोरॅमिक सनरूफ, एअर सस्पेंशन आणि इलेक्ट्रिक थाई सपोर्ट यांचा समावेश आहे.