जगभरात आपल्या लक्झरी आणि हाय परफॉर्मन्स कारने सर्वाना भुरळ घालणारी कंपनी टेस्ला, लवकरच भारतात एंट्री मारण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीची कार मुंबई पुणे महामार्गावर टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली होती. पण आता कंपनीला एक झटका मिळाला आहे? नेमकं घडलं काय? चला जाणून घेऊयात.
जगातील अनेक आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्या भारतात त्यांच्या कार ऑफर करत असतात. पण आता लवकरच या यादीत टेस्लाचे नावही जोडले जाणार आहे. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, टेस्लाचा भारतातील प्रवास सुरु होण्यापूर्वीच कंपनीतील महत्वाच्या व्यक्तीने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चला याबद्दल अधिक माहिती घेऊयात.
Operation Sindoor नंतर जर भारत-पाकिस्तानात युद्ध झालेच तर लष्करासाठी खूप फायद्याची ठरेल ‘ही’ कार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टेस्ला इंडियाचे हेड प्रशांत मेनन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजीनाम्याचे कारण वैयक्तिक असल्याचे सांगितले जात आहे, परंतु अद्याप संपूर्ण माहिती समोर आलेली नाही.
वृत्तानुसार, प्रशांत मेनन यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु सध्या तरी चीनची टीम ऑपरेशनल कामावर देखरेख करेल अशी अपेक्षा आहे.
प्रशांत मेनन हे टेस्लामध्ये बऱ्याच काळापासून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते सुमारे नऊ वर्षे टेस्लामध्ये कार्यरत होते. तसेच ते चार वर्षांहून अधिक काळ टेस्ला इंडिया बोर्डाचे अध्यक्ष देखील होते. विशेष म्हणजे 2021 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील पुणे शहरात टेस्लाचे ऑफिस देखील स्थापन केले होते.
रिपोर्ट्सनुसार, टेस्ला लवकरच भारतात आपला प्रवास सुरू करण्याची तयारी करत आहे. काही काळापूर्वी, कंपनी भारतात त्यांच्या पहिल्या शोरूमसाठी जागा शोधत होती आणि त्यानंतर मार्च 2025 मध्ये, मुंबईतील वांद्रे कुर्ला येथे जागा अंतिम करण्यात आली आणि शोरूमसाठी लीज डील देखील साइन करण्यात आली.
अशी डील पुन्हा येणार नाही ! या कारचा जुना स्टॉक रिकामा करण्यासाठी कंपनी देतेय 1 लाखांची सूट
शोरूमसोबतच, टेस्ला कारचीही भारतात टेस्टिंग घेतली जात आहे. सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत होत्या, ज्यामध्ये पूर्णपणे झाकलेल्या टेस्ला कारची टेस्टिंग घेतली जात होती. काही काळापूर्वी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर टेस्टिंग दरम्यान कंपनीच्या कार स्पॉट झाल्या आहेत.
विक्रीच्या बाबतीत, 2025 च्या पहिल्या तिमाहीत टेस्लाच्या निव्वळ नफ्यात वर्षानुवर्षे 71 टक्क्यांची घट झाली आहे.