फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑटो कंपन्या दमदार कार्स ऑफर करत असतात. मात्र, फक्त कार्स लाँच केल्याने ग्राहकांचे लक्ष त्या कारकडे जाते. त्यांचे मन खरेदीकडे वळवण्यासाठी अनेक ऑटो कंपन्या दमदार ऑफर्स देखील देत असतात. अशातच आता MG Motor India ने आपल्या एका कारवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट दिली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
JSW MG मोटर इंडियाने भारतीय मार्केटमध्ये 6 वर्षे पूर्ण केली आहेत. या खास प्रसंगी, कंपनीने त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV MG ZS EV वर एक उत्तम डिस्काउंट ऑफर जाहीर केली आहे. या डिस्काउंट ऑफरच्या घोषणेनंतर, ही कार आणखी स्वस्त झाली आहे. जून 2025 मध्ये MG ZS EV वर किती सूट उपलब्ध आहे आणि त्यात कोणत्या उत्तम फीचर्स आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.
मेट्रोपेक्षाही स्वस्त आहे ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवरून अप-डाउन करणं, मिळेल 150 किमीची रेंज
MG मोटरने आपल्या Gloster या प्रीमियम SUV कारच्या किंमतीत लक्षणीय कपात केली आहे. यामध्ये बेस व्हेरियंट Executive जुनी किंमत ₹16,88,000 होती, ती आता ₹16,75,000 करण्यात आली असून ग्राहकांना ₹13,000 ची बचत होणार आहे. Excite Pro या व्हेरियंटमध्ये ₹48,000 ची कपात करण्यात आली असून त्याची नवीन किंमत ₹18,49,800 इतकी आहे.
याशिवाय, Exclusive Plus व्हेरियंटमध्ये सर्वाधिक म्हणजेच ₹4,15,000 ची बचत मिळत असून त्याची नवीन किंमत ₹19,49,800 झाली आहे. तसेच, टॉप व्हेरियंट Essence मध्ये तब्बल ₹4,44,000 ची कपात करून नवीन किंमत ₹20,49,800 करण्यात आली आहे. या किंमत कपातीमुळे ग्राहकांना Gloster खरेदी करताना मोठा फायदा होणार आहे.
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर Jaguar ने रद्द केला ‘हा’ मोठा इव्हेंट
MG ZS EV मध्ये 50.3 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे, जो त्याच्या 2022 च्या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये अपडेट करण्यात आला होता. फ्रंट-व्हील ड्राइव्ह (FWD) सिस्टमसह ते 177 PS पॉवर आणि 280 Nm टॉर्क जनरेट करते. MG ZS EV ची ARAI-प्रमाणित रेंज 461 किमी आहे, ज्यामुळे ती भारतीय बाजारपेठेतील सर्वात लांब रेंजच्या इलेक्ट्रिक SUV पैकी एक बनते. कंपनी त्याच्या बॅटरीवर 8 वर्षे किंवा 1.5 लाख किमीची वॉरंटी देते. 50 kW DC फास्ट चार्जरसह सुमारे 60 मिनिटांत ती 0-80% चार्ज होते. तसेच, 7.4 kW AC चार्जरसह 0-100% चार्ज होण्यासाठी सुमारे 8.5-9 तास लागतात.