फोटो सौजन्य: @Kinglamarr___ (X.com)
भारतीय मार्केटमध्ये लक्झरी कार्सची वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. खासकरून अनेक सेलिब्रेटी आणि राजकारणी लोकं कार कलेक्शनमध्ये आलिशान कारचा समावेश करत असतात. तर दुसरीकडे इतर या कार्सच्या विक्रीत सुद्धा सातत्याने वाढ होत आहे.
देशात अनेक कार उत्पदक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट लक्झरी कार्स ऑफर करत असतात. आता लवकरच टोयोटाने आपली नवीन लक्झरी कार Toyota Land Cruiser Prado J250 लाँच करणार आहे.
पहिल्यांदाच, भारतात टोयोटा लँड क्रूझर प्राडो J250 चे डिझेल व्हेरिएंट विक्रीला सुरुवात झाली आहे. ही माहिती केरळच्या ऑटो मार्केटमधून समोर आली आहे, जिथे ही लक्झरी ऑफ-रोड एसयूव्ही निवडक ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Mercedes ने ‘या’ कारसाठी जारी केला रिकॉल, कारला आग लागण्याची शक्यता
ऑगस्ट २०२३ मध्ये प्राडो J250 मॉडेल ग्लोबल लेव्हलवर लाँच करण्यात आली होती. त्याचे काही युनिट्स आधीच भारतात पोहोचले आहेत, जसे की फेब्रुवारी 2025 मध्ये पंजाबमध्ये प्राडोच्या चार एसयूव्ही दिसल्या. हे लक्झरी मॉडेल लँड क्रूझर LC300 च्या खाली ठेवले आहे आणि ते CBU (कंप्लीट बिल्ट युनिट) म्हणून भारतात आयात केले जात आहे.
या एसयूव्हीचे डिझाइन बॉक्सी, ऑफ-रोड फोकस्ड आणि प्रॅक्टिकल आहे, जुन्या J60 मॉडेलपासून प्रेरित आहे. Prado J250 ही GA-F प्लॅटफॉर्मवर बनवली गेली आहे. तसेच या कारची फ्रेम 50% ने सुधारली आहे. यात 2.8-लिटर डिझेल इंजिन (1GD-FTV) आहे, जे सुमारे 201 बीएचपी पॉवर आणि 500 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 48 व्ही माइल्ड हायब्रिड सिस्टम आणि 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देखील आहे. याशिवाय, ही एसयूव्ही आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल हायब्रिड आणि माइल्ड हायब्रिड डिझेल पर्यायांमध्ये देखील उपलब्ध आहे.
भारतात नवीन Honda City Sport लाँच, स्पोर्टी लूकसह मिळणार दमदार परफॉर्मन्स
केरळमध्ये ही एसयूव्ही दिसल्याने असे दिसून येते की Prado J250 च्या काही इम्पोर्ट केलेल्या युनिट्स आधीच भारतात पोहोचल्या आहेत. 2025 च्या अखेरीस हे मॉडेल भारतात अधिकृतपणे लाँच केले जाऊ शकते, अशी आशा आहे. या कारची अंदाजे किंमत 1.25 कोटी ते 1.50 कोटी रुपये आहे.
टोयोटा लँड क्रूझर प्राडो J250 ची भारतात एंट्री, विशेषतः केरळमध्ये होऊ शकते. यावरून देशात हाय-एंड ऑफ-रोडिंग एसयूव्हीची क्रेझ पुन्हा वाढत आहे. ही एसयूव्ही केवळ त्याच्या मजबूत डिझाइनसाठीच नाही तर त्यात दिलेल्या माईल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजीमुळे देखील खास बनते.