फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात जरी बजेट फ्रेंडली बाईक्सला चांगली मागणी मिळत असल्या तरी आजही अनेक जणांमध्ये पॉवरफुल आणि हाय परफॉर्मन्स बाईक्सची क्रेझ पाहायला मिळते. जर तुम्हाला शक्तिशाली बाईक्स आवडत असतील आणि तुम्ही एक पॉवरफुल आणि हाय परफॉर्मन्स देणारी बाईकच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण अशा पॉवरफुल बाईक्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये असणार आहे.
ट्विन 900 ही एक स्टायलिश, कम्फर्टेबल रोडस्टर बाईक आहे जी 900 सीसी, पॅरलल-ट्विन इंजिन वापरते. त्याचे इंजिन 65 एचपी पॉवर आणि 80 एनएम टॉर्क जनरेट करते. बाईकमध्ये उपलब्ध असलेली पॉवर याला अतिशय वेगवान आणि पॉवरफुल परफॉर्मन्स देणारी बाईक बनवते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 9.69 लाख रुपये आहे.
‘या’ SUV मुळे Hyundai चे नशीब पालटले ! भारतात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या कारमध्ये समावेश
यात 649 सीसी, पॅरलल ट्विन इंजिन वापरले आहे, जे 68 एचपी पॉवर आणि 64 एनएम टॉर्क जनरेट करते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 6.92 लाख रुपये आहे. या लिस्टमध्ये ही सर्वात स्वस्त बाईक आहे.
डुकाटी स्क्रॅम्बलर आयकॉन डार्क ही एक सोपी आणि कम्फर्टेबल बाईक आहे. यात 803 सीसी, एल-ट्विन इंजिन वापरले आहे. त्याचे इंजिन 803 hp ची पॉवर आणि 65.2 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 9.97 लाख रुपये आहे. हे डुकाटीच्या परवडणाऱ्या मॉडेल्सपैकी एक आहे.
या बाईकमध्ये ६६० सीसी, लिक्विड-कूल्ड, 12-व्हॉल्व्ह, DOHC, इनलाइन 3-सिलेंडर, BS6 फेज 2 इंजिन वापरले आहे, जे 81 एचपी पॉवर आणि 64 एनएम टॉर्क जनरेट करते. ही बाईक फक्त 4.11 सेकंदात 100 किमी/ताशी वेग गाठू शकते. ट्रायम्फ ट्रायडंट 660 ची एक्स-शोरूम किंमत 8.25 लाख रुपये आहे.
KTM च्या ‘या’ बाईक्स मार्केटला राम राम करण्याच्या तयारीत? ऑफिशियल वेबसाइट वरून सुद्धा गायब
या बाईकमध्ये 776 सीसी, लिक्विड-कूल्ड, 4-स्ट्रोक, पॅरलल-ट्विन (2-सिलेंडर), डीओएचसी (डबल ओव्हरहेड कॅमशाफ्ट), 4-व्हॉल्व्ह प्रति सिलेंडर इंजिन वापरते. त्याचे इंजिन 81.8 एचपी पॉवर आणि 78 एनएम टॉर्क जनरेट करते. सुझुकी GSX-8R ची एक्स-शोरूम किंमत 9.50 लाख रुपये आहे. ही किंमत तुमच्याजवळील शोरुमनुसार बदलू देखील शकते.
Kawasaki Z900 ही या लिस्टमधील सर्वात पॉवरफुल बाईक आहे. यात 948 सीसी, लिक्विड-कूल्ड, 4-स्ट्रोक, इनलाइन 4-सिलेंडर, डीओएचसी, 16-व्हॉल्व्ह, बीएस6 फेज 2 इंजिन वापरले आहे. हे इंजिन 125hp ची पॉवर आणि 98.6Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 8.99 लाख रुपये आहे.