फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अनेक उत्तम ऑटो कंपन्या कार्यरत आहे. यातही स्वदेशी सोबतच विदेशी कंपन्यांचा देखील समावेश आहे. साऊथ कोरियन कंपनी ह्युंदाई देखील मार्केटमध्ये अनेक दमदार कार ऑफर करत आहे. ग्राहक देखील कंपनीच्या कार्सला चांगला प्रतिसाद देत आहे. म्हणूनच तर कंपनीने विक्रीच्या बाबतीत Mahindra ला मागे सोडले आहे.
ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (HMIL) पुन्हा एकदा कार विक्रीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. कंपनीची लोकप्रिय एसयूव्ही, ह्युंदाई क्रेटाने कंपनीला पुन्हा दुसऱ्या स्थानावर आणले आहे. एवढेच नाही तर ही कार भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल बनले आहे.
KTM च्या ‘या’ बाईक्स मार्केटला राम राम करण्याच्या तयारीत? ऑफिशियल वेबसाइट वरून सुद्धा गायब
2024-25 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च दरम्यान देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे, ज्यामुळे भारतातील एसयूव्ही सेगमेंटमध्ये नवीन बेंचमार्क स्थापित झाला आहे. Hyundai Creta ची मासिक आणि वार्षिक विक्री कशी राहिली आहे आणि विक्रीत वाढ होण्याचे कारण काय होते? त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
मार्च 2025 मध्ये ह्युंदाई क्रेटाने 18,059 युनिट्स विकल्या आहेत. यासह, क्रेटाने भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत आपला दबदबा निर्माण केला आहे. तसेच, 2024-25 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत, त्यातील 52,898 युनिट्स विकल्या गेल्या, ज्यामुळे ती भारतातील सर्वात पसंतीची एसयूव्ही बनली.
मासिक विक्रीसोबतच क्रेटाची वार्षिक विक्री देखील चांगली होती. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 1,94,871 क्रेटा विकल्या गेल्या, ज्यामध्ये वर्षानुवर्षे 20% वाढ झाली. या विक्रीसह, क्रेटा भारतातील तिसरी सर्वाधिक विक्री होणारी पॅसेंजर व्हेईकल बनली आहे.
ह्युंदाई क्रेटाच्या टॉप व्हेरियंटने कंपनीला भारतीय मार्केटमध्ये आपले वर्चस्व स्थापन करण्यास मदत केले आहे. या कारच्या ICE व्हर्जनचा विक्रीत 24% वाटा आहे, तर इलेक्ट्रिक कारचा विक्रीत 71% वाटा आहे. क्रेटाच्या सनरूफ व्हेरियंटने विक्रीत 69% वाटा आहे.
अखेर वेळ आलीच ! मार्केटमध्ये लाँच Maruti Suzuki ची पहिली EV, 500 km ची मिळणार रेंज
भारतीय मार्केटमध्ये, ह्युंदाई क्रेटाची किंमत 11.11 लाख रुपयांपासून सुरु होऊन 20.50 लाख रुपयांपर्यंतच्या जाते. ही कार डिझेल, पेट्रोल आणि इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये खरेदी करता येते. या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन नुकतेच लाँच करण्यात आले आहे.
ह्युंदाई क्रेटामध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा आणि ADAS सह 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोलसह एसी, वायरलेस फोन चार्जर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि 8-स्पीकर बोस साउंड सिस्टमसह 6 एअरबॅग्ज आणि TPMS यासह अनेक उत्तम सेफ्टी फीचर्ससह ऑफर केले आहे.