फोटो सौजन्य: @KiaInd/ X.com
भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये आपल्या कार्ससाठी ओळखली जाणारी Kia Motors आता लवकरच जागतिक स्तरावर Kia Seltos चे नवीन जनरेशन सादर करणार आहे. मागील काही दिवसांपासून या कारची जोरदार चर्चा होताना दिसत होती. ही कार लाँच होण्यापूर्वी, कंपनीने सोशल मीडियावर या एसयूव्हीचा एक नवीन टीझर जारी केला आहे. चला या कारबद्दल जाणून घेऊयात.
More muscle. Bolder stance. Sharper lines. Everything evolves but the Badass attitude stays unmistakably the same. The all-new Seltos. Global Premiere on December 10, 12:30 PM. To know more, visit: https://t.co/ugHQtAwkEb pic.twitter.com/Qw0JFC1kRN — Kia India (@KiaInd) December 6, 2025
Tata Sierra vs Hyundai Creta: दोन्ही एकाच सेगमेंटच्या कार, मात्र तुमच्यासाठी बेस्ट कोणती? जाणून घ्या
सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या एका नवीन टीझरमध्ये एसयूव्हीचा एक्सटिरिअर दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये अनेक फीचर्सबद्दल माहिती मिळाली आहे. टीझरमध्ये दाखवलेला व्हेरिएंट एक्स-लाइन व्हेरिएंट आहे, जो मॅट ब्लॅक पेंटमध्ये देण्यात येईल.
टीझरनुसार, एसयूव्हीमध्ये एलईडी डीआरएल, नवीन एलईडी हेडलाइट्स, एलईडी फॉग लाईट्स, पेंटागन म्हणेजच पंचकोनी आकाराचा इन्सर्टसह एक नवीन मागील बंपर, हाय-माउंट स्टॉप लॅम्प, ग्लॉस-ब्लॅक व्हील आर्च क्लॅडिंग आणि शार्क-फिन अँटेना असेल. यात नवीन ओआरव्हीएम, एक नवीन डॅशबोर्ड, एक सुधारित स्क्रीन आणि एक नवीन इंटिरिअर देखील असेल.
‘या’ आहेत Maruti Suzuki च्या सर्वात सुरक्षित कार, प्रत्येकाला मिळाली आहे 5 स्टार सेफ्टी रेटिंग
ही एसयूव्ही 10 डिसेंबर रोजी कंपनीकडून अधिकृतपणे सादर केली जाईल, त्यानंतर ती खरेदीसाठी उपलब्ध असेल.
किया सेल्टोस ही मध्यम आकाराची एसयूव्ही म्हणून ऑफर केली जाऊ शकते. या सेगमेंटमध्ये, ही कार Maruti Grand Vitara, Skoda Kushaq, Hyundai Creta, आणि Honda Elevate सारख्या एसयूव्हीशी थेट स्पर्धा करते.






