फोटो सौजन्य: Social Media
भारतात देखील आता इलेक्ट्रिक वाहनांना अच्छे दिन येत आहे. ग्राहक देखील या नव्या इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद देत आहेत. म्हणूनच तर आता रस्त्यांवर इलेक्ट्रिक कार, बाईक आणि स्कूटर मोठ्या प्रमाणात धावताना दिसत आहे. हीच वाढती मागणी पाहून देशातील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत आता नवीन इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्या आपली वाहनं ऑफर करत आहे.
देशात अनेक वर्षांपासून Ola Electric उत्तम रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत आहे. काही महिन्यांपूर्वीच कंपनीने ई बाईक सेगमेंटमध्ये Ola Roadster X लाँच केली होती. पण आता या बाईकची डिलिव्हरी लांबवली आहे. रेग्युलेटरी फाइलिंगमध्ये, ओला इलेक्ट्रिकने जाहीर केले की त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक बाईकची डिलिव्हरी आता मे महिन्यात सुरू होईल. हेच आश्वासन पूर्वी एप्रिल 2025 पर्यंत डिलिव्हरी देण्याचे होते.
‘या’ SUV ने Tata Punch ला बाहेरचा रस्ता दाखवत मिळवले Top 10 Cars च्या यादीत स्थान
भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील कंपनीने यापूर्वी मार्चपासून या बाईकचे डिलिव्हरी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते आता एका महिन्याने उशिराने झाले. आता रोडस्टरची डिलिव्हरी वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. याचा परिणाम रोडस्टर आणि रोडस्टर प्रो मॉडेल्सवर होण्याची शक्यता आहे.
जरी ओलाने याची पुष्टी केलेली नसली तरी, अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की सुरुवातीचा विलंबाचे कारण रोडस्टर एक्सवरील डिलिव्हरीच्या वेळेपूर्वी अपूर्ण होमोलोगेशन प्रक्रिया आहे. परंतु, कंपनीने दावा केला की रोडस्टर एक्स मॉडेल्सची पहिली बॅच 11 एप्रिल 2025 रोजी ब्रँडच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमधून बाहेर पडली.
फेब्रुवारी महिन्यात ओला इलेक्ट्रिकने त्यांच्या विक्रीच्या आकडेवारीत 1,395 रोडस्टर एक्स बुकिंग्स समाविष्ट केल्या, जरी या बाईकची डिलिव्हरी अद्याप झालेली नाही. यामुळे कंपनीला रेग्युलेटरी संस्थांकडून चौकशीला सामोरे जावे लागले. एका अलीकडील अहवालानुसार, सेबी (SEBI) ओला इलेक्ट्रिकविरोधात संभाव्य इनसाईडर ट्रेडिंग व संशयास्पद संबंधित-पक्ष व्यवहार यासंदर्भात तपास करत आहे. मात्र, ओलाने या संदर्भात निवेदन जारी करून संबंधित अहवाल पूर्णपणे चुकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे.
TVS, Hero आणि Bajaj Auto सारख्या टू व्हीलर कंपन्यांसाठी कसा होता April 2025 महिना?
ओला काही काळापासून रोडस्टर एक्स या इलेक्ट्रिक बाईकसाठी बुकिंग स्वीकारत आहे. अलीकडेच ही बाईक एका डीलरशिपवर दिसून आली, त्यामुळे लवकरच डिलिव्हरी सुरू होण्याची शक्यता आहे. या एंट्री-लेव्हल कम्युटर ई-बाईकची किंमत ₹74,999 (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, जी तिला भारतातील सर्वात परवडणाऱ्या इलेक्ट्रिक बाईक्सपैकी एक बनवते.
ओला रोडस्टर एक्स तीन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आली आहे:
बेस व्हेरिएंट – 2.5 kWh बॅटरीसह, साधारणतः 140 किमी रेंज
मिड व्हेरिएंट – 3.5 kWh बॅटरीसह, अंदाजे 196 किमी रेंज
टॉप व्हेरिएंट – 4.5 kWh बॅटरीसह, सुमारे 252 किमी रेंज
तिन्ही व्हेरिएंट्समध्ये 7 kW (9.3 बीएचपी) क्षमतेची मिड-ड्राइव्ह माउंटेड इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आली आहे.