! चीनने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी पाठवली Hongqi Car (फोटो सौजन्य; X.com)
भारत आणि चीनचे संबंध कसे आहेत हे आपण सर्वच जाणतो. यातही अनेकदा दोन्ही देशात सीमावाद गंभीर देखील होतो. तरी देखील दोन्ही देशांमध्ये अजूनही व्यापार सुरळीत चालू आहे. अशातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर आहेत. यामुळे संपूर्ण देशवासीयांचे लक्ष पंतप्रधानांच्या दौऱ्याकडे लागले आहे. तसेच चीन भारताच्या पंतप्रधानांचे स्वागत कसे करेल असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात होता. मात्र, यावेळी चीनने भारतीयांची मन जिंकले आहे.
जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) चीनमध्ये पोहोचले तेव्हा त्यांचे स्वागत वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. खरंतर, तेथील सरकारने त्यांच्या प्रवासासाठी Hongqi L5 नावाची एक खास लक्झरी लिमोझिन पाठवली होती. ही कार सामान्य नाही कारण चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग देखील त्यांच्या अधिकृत दौऱ्यांमध्ये या मॉडेलचा वापर करतात. या लक्झरी कारची खासियत सविस्तरपणे जाणून घेऊयात.
भारतात Tata Winger Plus लाँच, या 9 सीटर कमर्शियल वाहनात मिळेल आरामच आराम
Hongqi ही केवळ चीनसाठी एक कार नाही तर राष्ट्रीय अभिमान आणि स्वावलंबनाचे प्रतीक आहे. या कारची लांबी सुमारे 18 फूट आहे आणि याचे वजन सुमारे 3.1 टन आहे. या लक्झरी कारची किंमत सुमारे 7 कोटी रुपये आहे. होंगकी ही चीनची सर्वात जुनी लक्झरी कार ब्रँड आहे, जी 1958 मध्ये सुरू झाली. ती FAW ग्रुप (फर्स्ट ऑटोमोबाईल वर्क्स) द्वारे बनवली जाते.
खरंतर, ही कार चीनमध्ये ‘रेड फ्लॅग’ म्हणूनही ओळखली जाते. 2019 मध्ये जेव्हा चीनचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा ही कार त्यांच्यासोबत होती. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ही कार चिनी राष्ट्रपतींसाठी खूप खास आणि महत्त्वाची आहे. पंतप्रधान मोदी आता त्यांच्या सध्याच्या चीन दौऱ्यात या कारमध्ये प्रवास करत आहेत.
2 लाखाचं डाउन पेमेंट आणि Tata Altroz Facelift बेस व्हेरिएंट तुमच्या दारात उभी, किती असेल EMI?
जेव्हा पंतप्रधान मोदी या कारमध्ये बसले होते, तेव्हा हा एक राजनैतिक संदेश देखील होता. हा सन्मान फक्त खास पाहुण्यांना दिला जातो आणि हे दर्शविते की चीनला त्याच्या राष्ट्रीय ओळखीचा आणि लक्झरी क्षमतेचा अभिमान आहे. पूर्वी चीन पाश्चात्य देशांच्या लक्झरी कारवर अवलंबून होता, परंतु आता तो स्वतः बनवलेल्या कारने जगाला आपल्याकडे आकर्षित करू पाहत आहे. अमेरिकेकडे Cadillac आहे किंवा ब्रिटनकडे Rolls-Royce आहे त्याच प्रकारे चीन Hongqi सादर करते. ही कार चीनच्या “मेड इन चायना” स्वप्नाचा एक भाग आहे, जे सिद्ध करते की चीन केवळ स्वस्त वस्तू बनवणारा देश नाही तर लक्झरी आणि हाय-टेक उत्पादने बनवण्यास देखील सक्षम आहे.