फोटो सौजन्य: @NavinRa93671195/X.com
भारतीय ऑटो बाजारात विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या जातात. कमर्शियल व्हेईकल सेगमेंटमध्ये सुद्धा अनेक ऑटो कंपन्यांनी दमदार वाहनं ऑफर केली आहेत. या सेगमेंटमधील वाहनांमुळे अनेक जणांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे या वाहनांना चांगली मागणी मिळताना दिसते. नुकतेच देशातील आघाडीच्या वाहनं उत्पादक कंपनीने या सेगमेंटमध्ये एक नवीन वाहन लाँच केले आहे.
देशातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेली टाटा मोटर्स अनेक सेगमेंटमध्ये वाहनं ऑफर करते. ही कंपनी पॅसेंजर व्हेईकलसह कमर्शियल व्हेईकल सेगमेंटमध्ये सुद्धा अनेक पर्याय ऑफर करते. टाटाने अलीकडेच कमर्शियल व्हेईकल सेगमेंटमध्ये Tata Winger Plus लाँच केली आहे. त्यात कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले गेले आहेत? याचे इंजिन किती पॉवरफुल आहे? कोणत्या किंमतीत ही कार लाँच केली गेली आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊयात.
2 लाखाचं डाउन पेमेंट आणि Tata Altroz Facelift बेस व्हेरिएंट तुमच्या दारात उभी, किती असेल EMI?
कमर्शियल व्हेईकल सेगमेंटमध्ये टाटा विंगर प्लस लाँच करण्यात आली आहे. पर्यटक आणि कर्मचाऱ्यांची वाहतूक आरामदायी व्हावी यासाठी कंपनीने हे वाहनं लाँच केले आहे. हे वाहन मोनोकोक चेसिसवर बनवले आहे जे त्याला उत्तम सुरक्षा आणि स्थिरता देते.
टाटा विंगर प्लसमध्ये कंपनीने 9 जागा दिल्या आहेत. यासोबतच, त्यात ॲडजस्टेबल आर्मरेस्ट, रिक्लाइनिंग कॅप्टन सीट्स, पर्सनल यूएसबी चार्जिंग पॉइंट्स, पर्सनल एसी व्हेंट्स आणि पुरेशी लेग स्पेस देण्यात आली आहे.
कंपनीने त्यात 2.2 लिटर क्षमतेचे डायकोर डिझेल इंजिन दिले आहे. ज्यामुळे या वाहनाला 100 हॉर्सपॉवर आणि 200 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो.
TVS Raider च्या नवीन लूक समोर भल्याभल्या बाईक फिक्या, Marvel लव्हर्ससाठी तर पर्वणीच
टाटा मोटर्सच्या कमर्शियल पॅसेंजर व्हेइकल व्यवसायाचे व्हाइस प्रेसिडेंट आनंद एस म्हणाले की, विंगर प्लस हे प्रवाशांना उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी विचारपूर्वक डिझाइन करण्यात आले आहे.
भारतामधील प्रवासी गतिशीलतेचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. शहरी भागात कर्मचार्यांच्या वाहतुकीपासून देशभरातील पर्यटनाच्या वाढत्या मागणीपर्यंत. या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी विंगर प्लस सादर करण्यात आले असून, कमर्शियल पॅसेंजर व्हेइकल सेगमेंटमध्ये नवे मापदंड प्रस्थापित करत आहे.
टाटाकडून नुकतेच सादर केलेल्या Tata Winger Plus ची भारतातील एक्स-शोरूम किंमत 20.60 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.