फोटो सौजन्य: Gemini
टोयोटा 2026 मध्ये आपले इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ वाढवत Urban Cruiser BEV बाजारात आणण्याची तयारी करत आहे. रिपोर्ट्सनुसार ही कंपनीची पूर्णपणे नवीन इलेक्ट्रिक SUV असेल आणि ती खास बजेट-फ्रेंडली EV मार्केट लक्षात घेऊन विकसित केली जात आहे.
याच्या प्लॅटफॉर्म आणि बॅटरी क्षमतेबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र अंदाज आहे की हा मॉडेल टोयोटाच्या लो-कॉस्ट EV स्ट्रॅटेजीचा भाग असेल. लाँच झाल्यावर ही SUV Hyundai Venue EV आणि Tata Nexon EV सारख्या लोकप्रिय मॉडेल्सना थेट स्पर्धा देईल.
Tata Motors आपली आयकॉनिक Sierra इलेक्ट्रिक व्हेर्जनमध्ये पुन्हा लाँच करण्याच्या तयारीत आहे. ICE व्हर्जननंतर याचा पूर्णतः इलेक्ट्रिक मॉडेल 2026 च्या सुरुवातीला भारतात दाखल होऊ शकतो. Sierra EV तिच्या स्टायलिश डिझाइन आणि प्रीमियम फीचर्समुळे आधीच चर्चेत आहे.
Sierra EV मध्ये Curvv EV आणि Harrier EV प्रमाणे मोठा बॅटरी सेटअप आणि नवीन इलेक्ट्रिक आर्किटेक्चर मिळण्याची शक्यता आहे. अधिक रेंज देणारी बॅटरी ऑप्शन्स आणि नवे केबिन लेआउट मिळू शकते, ज्यामुळे ही SUV भारतातील सर्वात आकर्षक इलेक्ट्रिक SUVs पैकी एक ठरू शकते.
महिंद्रा 2026 मध्ये XUV 3XO EV सादर करू शकते, जी कंपनीची सर्वात किफायतशीर इलेक्ट्रिक SUV मानली जात आहे. कमी बजेटमध्ये फीचर्सने परिपूर्ण EV शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. यात दोन बॅटरी ऑप्शन्स मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यातील मोठा बॅटरी सेटअप 450+ km रेंज देऊ शकतो. नवीन केबिन, मॉडर्न फीचर्स आणि आकर्षक डिझाइनमुळे ती Tata Punch EV साठी मोठे आव्हान ठरू शकते.
कमबॅक झालाय बॉस! भल्याभल्या बॉलिवूड स्टार्सलाही लाजवेल असे Akshaye Khanna चे कार कलेक्शन
महिंद्राची BE Rall-E ही एक विशेष इलेक्ट्रिक SUV आहे, जी ऑफ-रोडिंग आणि ॲडव्हेंचर ड्रायव्हिंग लक्षात घेऊन विकसित केली जात आहे. याचे प्रोडक्शन मॉडेल 2026 मध्ये बाजारात दाखल होऊ शकते. ही SUV INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित असून मजबूत सस्पेंशन, स्पेशल डिझाइन एलिमेंट्स आणि नवीन मेकॅनिकल अपडेट्ससह येण्याची शक्यता आहे.






